शिवसेनेला आव्हान देण्यासाठी भाजपा पुन्हा मैदानात; वरळीत सुरु करणार युवा वॉरियर शाखा

शिवसेनेला आव्हान देण्यासाठी भाजपा पुन्हा मैदानात; वरळीत सुरु करणार युवा वॉरियर शाखा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला थेट आव्हान देण्यासाठी भाजप पुन्हा एकदा वरळीच्या मैदानात उतरणार आहे.

चेतन ननावरे, मुंबई

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला थेट आव्हान देण्यासाठी भाजप पुन्हा एकदा वरळीच्या मैदानात उतरणार आहे. आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभेत दहीहंडी आणि मराठी दीपोस्तव धूमधडाक्यात साजरा केल्यानंतर भाजपने आता युवा सेनेला टक्कर देण्यासाठी या ठिकाणी युवा वॉरियर शाखा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी भाजपचे युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व तरूण खासदार तेजस्वी सूर्या आज वरळी दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते भाजपच्या पहिल्या युवा वॉरिअर शाखेचे उद्घाटन केले जाईल. दरम्यान अवघ्या ३१ वर्षांचे तरुण खासदार तेजस्वी सूर्या येथील युवकांसोबत संवादही साधतील. देशातील युवकांमध्ये कमालीची क्रेझ असलेल्या तेजस्वी सूर्या यांना थेट वरळीत उतरवत भाजपने पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना आव्हान दिले आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com