'उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत जुळवून घ्यावे अन् शिवसेना वाचवावी'

'उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत जुळवून घ्यावे अन् शिवसेना वाचवावी'

नवनीत राणांचा उध्दव ठाकरेंना खोचक सल्ला

सूरज दहाट | अमरावती : निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांचा विजय झाला आहे. धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. यानंतर अमरावतीत राणा दाम्पत्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच, नवनीत राणा यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला. अती करणाऱ्या लोकांची माती होते. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सोबत जुळवून घ्यावे व शिवसेना वाचवावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

'उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत जुळवून घ्यावे अन् शिवसेना वाचवावी'
उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण पुन्हा मिळू शकतो का? उज्ज्वल निकम म्हणाले...

महाशिवरात्रीनिमित्त रवी राणा व नवनीत राणा यांनी अमरावतीच्या गडगडेश्वर मंदिरात जाऊन शंकराची पूजा करत दर्शन घेतलं. यावेळी राणा दाम्पत्याने धनुष्यबाण हातात घेऊन त्यातून तीर सोडला. यानंतर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली. रामावर विश्वास ठेवणारे आणि हनुमंतांना मानणारे बाळासाहेब ठाकरे होते म्हणून त्यांनी धनुष्यबाण चिन्ह मागितलं होतं. आता ती कमान बाणातून निघाली आहे व खरी विचारधारा असलेल्या एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाणची कमान पोहचली आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

तसेच, अती करणाऱ्या लोकांची माती होते. आणि आता माती खाणाऱ्या लोकांचे दिवस आले आहेत. तर बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना उद्धव ठाकरे यांनी डूबवली. आताही वेळ गेली नाही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसोबत जुळवून घ्यावे व शिवसेना वाचवावी, असा प्रहार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com