नाना पटोलेंना कोणत्याही खुर्चीकडे बघण्याची संधीसुद्धा मिळणार नाही; देसाईंचा टोला

नाना पटोलेंना कोणत्याही खुर्चीकडे बघण्याची संधीसुद्धा मिळणार नाही; देसाईंचा टोला

नाना पटोलेंच्या टीकेचा शंभूराज देसाईंनी घेतला समाचार
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

प्रशांत जगताप | सातारा : दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर लक्ष ठेवून आहेत, असं विधान नाना पटोले यांनी केलं होतं. या वक्तव्याचा शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी चांगलाच समाचार घेतला आमचा संसार सुखाचा चालला आहे. नाना पटोलेंनी वाट बघावी. नाना पटोलेंना कोणत्याही खुर्चीकडे बघण्याची संधी सुद्धा मिळणार नाही, असा जोरदार टोला शंभूराज देसाई यांनी लगावला आहे.

नाना पटोलेंना कोणत्याही खुर्चीकडे बघण्याची संधीसुद्धा मिळणार नाही; देसाईंचा टोला
मोठी बातमी! महाविकास आघाडी 'राष्ट्रवादी' शिवाय लढवणार निवडणूक?

नाना पटोले यांनी आमची काळजी करण्याची गरज नाही. आमचा संसार सुखाचा चालला आहे. मुख्यमंत्र्यांची खुर्ची ही भरलेली आहे, रिकामी नाही.. ज्यांना ज्यांना ज्या खुर्च्या मिळाल्या आहेत त्या खुर्चीवर आम्ही बसलो आहोत. आम्ही सर्व समाधानी आहो. नाना पटोलेंनी वाट बघावी. नाना पटोलेंना कोणत्याही खुर्चीकडे बघण्याची संधी सुद्धा मिळणार नाही असे सांगत नाना पटोलेंवर टीका केली आहे.

कोणाच कोणावर अतिक्रमण नाही. आम्हा तिघांचा सुखी संसार आहे. आम्ही तिघे एकमेकांच्या विचारावर काम करत आहे. आम्ही कोणावर अतिक्रमण करत नाही. आमच्यात कसलेही मतभेद नाही रस्सीखेच नाही, चढाओढ नाही, असेही देसाईंनी म्हंटले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना विचारलं पाहिजे की पवार साहेबांना सोडून काही तयारी करायची का? उद्धव ठाकरे यांचा निर्णय संजय राऊत घेत असतात, संजय राऊतांना सोडून नाना पटोले उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांनी वेळ साधली, पवार साहेबांना सोडून संजय राऊत काहीच होऊ देणार नाही, त्यामुळे दोघांनी लढावं, तिघांनी लढावं. लोकसभेच्या 45 जागा मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2024 साली लढून आणू आणि सव्वा 200 च्या प्लस जागा 2024 च्या निवडणुकीला आम्ही तिघांच्या नेतृत्वाखाली विधानसभेला जिंकणार असल्याचा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com