MLA Anil Babar, Eknath Shinde & Uddhav Thackeray
MLA Anil Babar, Eknath Shinde & Uddhav ThackerayTeam Lokshahi

Eknath Shinde यांच्यासोबत नॉट रिचेबल असलेले सांगलीतील आमदार अनिल बाबर यांची कारकिर्द

पश्चिम महाराष्ट्रात ‘पाणीदार-आमदार’ ओळख
Published by :
Vikrant Shinde

विधान परिषद निवडणूक पार पडली असून भाजपचे (BJP) पाचही उमेदवार निवडून आले. भाजपच्या गटात जल्लोष सुरू असला तरी शिवसेनेमध्ये खळबळ माजली आहे. शिवसेनेचे महत्त्वाचे नेते व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे कालपासूनच नॉट रिचेबल असून सध्या ते सूरत येथे असल्याची माहिती मिळते आहे. तर, ते शिवसेनेवर नाराज असल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. तर, त्यांच्यासोबत आणखीही 25-30 आमदार असल्याचे बोलले जात आहे. या नॉट रिचेबल असलेल्या आमदारांपैकी एक म्हणजे खानापूर आटपाडी मतदार संघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर.

सांगलीतील (Sangli) खानापूर तालुक्यातील गार्डी या गावी कल्जेराव बाबर या शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेले अनिल बाबर हे आजच्या घडीला नॉट रिचेबल असल्याने महाराष्ट्रभरात खळबळ उडाली आहे.

MLA Anil Babar, Eknath Shinde & Uddhav Thackeray
Eknath Shinde : बाळापूरचे आमदार नितिन देशमुख सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल

कशी आहे अनिल बाबर यांची कारकीर्द?

  1. वयाच्या 19व्या वर्षी मुळगाव असलेल्या गार्डी या गावचे ते सरपंच झाले.

  2. 1972 साली सांगली जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून निवडून आले.

  3. 1981 साली सांगली जिल्हा परिषदेच्या इमारत विभागाचे सभापतीपद मिळाले.

  4. 1982-1990 दरम्यान खानापूर पंचायत समितीचे सभापतीपद भुषवले.

  5. 1990 साली पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली व विजयी झाले.

  6. 1999 साली पुन्हा आमदारकी मिळवली.

  7. 1999-2008 दरम्यान नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑप लि. पुणेचे चेअरमनपद भूषवले.

  8. 2014 साली राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला.

  9. 2014 साली विधानसभेची निवडणूक जिंकली व ते सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार ठरले.

  10. 2019 साली पुन्हा शिवसेनेकडून निवडणूक लढवून आमदार झाले.

काय असू शकतं नाराजीचं कारण?

  1. जिल्ह्यातील शिवसेनेचे (Shivsena) एकमेव आमदार असूनही मंत्रीपद न मिळणं

  2. अनिल बाबर यांची एकंदरीत राजकीय कारकिर्द पाहता त्यांच्यापेक्षा अनुभवाने कमी असलेल्या नेत्यांना मंत्रीपद दिलं असल्याने दुय्यम वागणूक मिळाल्याची भावना मनात असल्याची शक्यता

  3. 2019 साली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर खानापूर-आटपाडी मतदार संघातील टेंभू योजनेसाठी पुरेसा निधी न मिळाल्यानं काम रखडलं आहे.

  4. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असलेले जयंत पाटील यांच्याकडून बाबर विरोधी गटाला जास्त ताकद दिली जाते, असं बाबर समर्थकांचं मत आहे.

  5. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवत असताना झालेल्या विजयामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याने अनिल बाबर यांना तेव्हापासून फडणवीसांचे निकटवर्तीय मानलं जातं

पाणीदार-आमदार अशी ओळख:

पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनिल बाबर यांची ओळख ही ‘पाणीदार-आमदार’ अशी आहे. याचं कारण म्हणजे, खानापूर-आटपाडी हा मतदारसंघ मुळात दुष्काळग्रस्त असल्याने त्या भागासाठी जायकवाडी प्रकल्पातून उर्वरीत पाणी फिरवून आणता येईल, अशी योजना मांडून ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अनिल बाबर हे राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षांत असताना प्रयत्नशील राहीले. या संपूर्ण योजनेला टेंभू योजना असं नाव दिलं असून, अनिल बाबर यांची ओळख ‘टेंभू योजनेचे जनक’ अशीही आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com