राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा' आज महाराष्ट्रात दाखल होणार

राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा' आज महाराष्ट्रात दाखल होणार

देशात सध्या कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेचे नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. कॉंग्रेसच्या या यात्रेला देशभरात उस्फुर्त प्रतिसाद मिळताना यावेळी दिसत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

देशात सध्या कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेचे नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. कॉंग्रेसच्या या यात्रेला देशभरात उस्फुर्त प्रतिसाद मिळताना यावेळी दिसत आहे. अशातच ही यात्रा आता महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. ही यात्रा आज 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या यात्रेची महाराष्ट्रातील जबाबदारी असणारे अशोक चव्हाण यांनी काल पत्रकार परिषद घेत याबाबतची सविस्तर माहिती दिली. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये दाखल होणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. या यात्रेसाठी कॉंग्रेसकडून जोरदार तयारी सुरु आहे.

रात्री देगलूर वन्नाळी ( प्रसिद्ध गुरुद्वारा ) अशी मशाल यात्रा करणार आहेत. हे 9 किमीचं अंतर असेल. रात्री साडेबारापर्यंत तिथली पूजाअर्चा करुन परत येताना देगलूरला राहुल गांधी कारने येणार आहेत. आठ तारखेला सकाळी पुन्हा कारने वन्नाळीला जाणार आहेत. तेथून यात्रा पुन्हा सुरु होणार आहे. रात्रीचा मुक्काम शंकरनगरला असेल, त्याआधी गोपाळा गावात कॅार्नर मीटिंग होणार आहे. दहा तारखेला होणाऱ्या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नांदेडमध्ये येणार आहेत. त्याशिवाय या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही दहा तारखेला यात्रेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेच्या नियोजनासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रदेश स्तरावरील 28 पदाधिकारी मदतीसाठी नियुक्त केले आहेत. या यात्रेत महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार आहेत. यात्रेला कसा प्रतिसाद मिळतो त्याकडे राज्य सरकारचे लक्ष असेल. महाराष्ट्रात येताच राहुल गांधी यांच्या हातात मशाल असणार आहे. क्रांतीचं प्रतिक असल्याने मशाल यात्रा काढत असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. मशाल हे शिवसेनेला नव्याने मिळालेलं अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. राहुल गांधी यांच्या स्वागतसाठी नांदेड आणि महाराष्ट्र सज्ज आहे. अशोक चव्हाणांनी महिनाभरापासून ही तयारी केली आहे. मशाल घेऊन ही यात्रा प्रवेश करणार आहे. ही खूप महत्त्वाची बाब आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.


logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com