Central Govt | OBC
Central Govt | OBCteam lokshahi

कल्याणमध्ये रविवारी बामसेफचे 36 वे राज्य अधिवेशन

ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी
Published by :
Shubham Tate

कल्याण (अमजद खान) - बामसेफचे 36 वे राज्यव्यापी अधिवेशन येत्या रविवारी 28 ऑगस्ट रोजी कल्याणमध्येआयोजित करण्यात आले असून या अधिवेशनात तीन महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. ओबीसीची जातिनिहास जनगणना करणयचा महत्वाचा विषय या अधिवेशनात चर्चिला जाणार आहे. या अधिवेशनास बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेक्षाम संबोधित करणार आहेत अशी माहिती बामसेफचे ठाणे जिल्हाध्यक्ष राहूल खैरे यांनी दिली आहे. (36th state convention of BAMSEF in Kalyan on Sunday demanded a caste-wise census of OBC)

Central Govt | OBC
गणेश उत्सवात शिंदे गट ठाकरेंना देणारा धक्का

आज कल्याणच्या साई नंदन हॉटेलच्या टेरीस हॉलमध्ये बामसेफच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेस प्रदेशाध्यक्ष संजय धाबर्डे यांच्यासह भारतीय मुक्ती मोर्चाचे काम पाहणारे संजय डिंपे आणि बामसेफचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष गणोश देशमुख आदी उपस्थित होते. केंद्र सरकार हे प्रस्थापित सरकार असून ओबीसीची जातिनिहाय जनगणना करीत नाही. ओबीसीची जातिनिहाय जनगणना केली पाहिजे या मुद्यावर अधिवेशनाच्या पहिल्या सत्रत चर्चा केली जाणारा आहे.

Central Govt | OBC
अनिल देशमुखांच्या छातीत कळ, जेलमध्येचं पडले बेशुद्ध

तुसऱ्या सत्रत संघटन तोडफोड करणाऱ्या कार्यक्रम पीएमओ स्तरावर चालवला जात आहे. यावरुन षडय़ंत्रची कल्पना यावी या विषयावर चिंतन केले जाणार आहे. तसेच धार्मिक धुव्रीकरण देश विभाजनाचा धोका या विषयावर तिसऱ्या सत्रत चिंतन केले जाणार आहे. या विविध विषयावर अनिल गेडाम, प्रताप पाटील, राजेंद्र राजदीप, सुजाता चौदंते, प्रा. आर. एस. यादव आणि बामसेफचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय धाबर्डे सहभागी होणार आहेत. हे अधिवेशन कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या साई नंदन हॉटेलच्या टेरीस हॉलमध्ये सकाळी अकरा ते रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान पार पडणार आहे. या अधिवेशनास राज्यभरातील 36 जिल्ह्यातून बामसेफचे जवळपास दोन हजार प्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com