आता ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली असून त्यात केदार दिघे यांना पाचपाखाडीमधून उमेदवारी मिळाली आहे. केदार दिघे एकनाथ शिंदेच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनील केदार यांनी जामीन मंजूर केला आहे.