परळी मतदार संघात मतदान केंद्रावर झालेल्या प्रकारानंतर फेर मतदान घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली. याबाबतचे पत्र निवडणूक विभागाला देण्यात आले आहे.
“थांबा…यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत एकदाच बटन दाबून मतदान संपणार नाही!” असा अनुभव अनेक मतदारांना येणार आहे. कारण जानेवारी 2026 मधील या निवडणुकीत मतदानाची पद्धतच बदलली आहे.
राज्यात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिकांसाठी सुरू असलेल्या प्रचारात सर्वच प्रमुख पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत.