कोरोनापाठोपाठ आता साथीच्या आजारांनीही राज्यात डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांपैकी चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मागील काही दिवसात नागपूर शहर आणि लगतच्या जिल्ह्या आणि राज्यातून उपचारार्थ आलेल्या मेंदूज्वर संशयित 20 रुग्ण मिळू आले आहे. यात आतापर्यंत 10 बालकांचा मृत्यू झाला आहे.