Kangana Ranaut
Kangana Ranaut  Team Lokshahi
मनोरंजन

Kangana Ranaut : खलनायकास बनवा कॉमेडियन ; स्त्रियांच्या अस्तित्वाबद्दल कंगणाने केलं वक्तव्य...

Published by : Team Lokshahi

आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिने नुकतच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिच्या एका जुन्या मुलाखतीचा असून ज्यामध्ये कंगणा महिलांच्या अस्तित्वाबद्दल बोलली आहे. कंगनाच्या मते महिलांनी आपले हक्क मिळवण्यासाठी कसलीही वाट पाहू नये. आपल्या अस्तित्वासाठी त्यांनी हक्क काढून घेतलेच पाहिजेत. या व्यतिरिक्त कंगनाने एक नोटही शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लिहिलय की आयुष्यात प्रत्येकवेळी आपल्यातील 'खलनायक' या भूमिकेला बदलून 'कॉमेडियन' ही भूमिका घेतली पाहिजे.

अनुभवांद्वारे स्वत: ला चांगलं बनवा
कंगनाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहीली आहे. ज्यामध्ये ती म्हणतेय की “मला कधीच वाटलं नाही की माझ्या भावनांचा वापर मी अपमान, अपयश किंवा गुंडगिरी अशा प्रकारच्या चुकीच्या कामासाठी करावा. आपल्या अनुभवांचा उपयोग एखाद्याचे ध्येय साध्य करण्यासाठी किंवा स्वतःला महत्त्वाचं बनवण्यासाठी करायला पाहिजे.

Kangana Ranaut

खलनायकाला कॉमेडियनचं स्वरूप द्या

कंगनाने पुढे लिहिलं की जे तुमच्यावर टीका करतात, त्यांच्या नजरेतून तुम्ही स्वतःला कधीच पाहू नका. तुम्ही आयुष्यात पुढे गेल्यावर त्यांना एक दिवस नक्कीच लाजवाल. हसल्याशिवाय जीवन नसून हसत हसत जगणं हेच जीवन आहे. ज्यांना तुमच्या आयुष्यात 'खलनायक' व्हायचे आहे अशा लोकांना 'कॉमेडियन' बनवण्याचा प्रयत्न करावा.

नकारात्मकता असूनही आपलं नाव मोठं केलं
हा व्हिडिओ बीबीसीला दिलेल्या मुलाखतीचा आहे. ज्यामध्ये तिने सांगितले की लोकांच्या नकारात्मक गोष्टी असूनही तिने चित्रपटसृष्टीत स्वत:ला सिद्ध करून आपलं नाव कमावलं. कंगनाने व्हिडीओ शेअर करत लिहिले की इंग्रजी न बोलल्यामुळे अपमानित झालेल्या व्यक्तीने आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व केलं.

गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी; अमोल कोल्हे म्हणाले...

गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी; संजय राऊत म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात सभा; संजय मंडलिक म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात जाहीर सभा; धैर्यशील माने यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Balya Mama Mhatre : या देशात एक परिवर्तनाची लाट तयार झालेली आहे