लोकशाही स्पेशल

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ‘हे’ विचार आजही प्रेरणा देतात!

Published by : Lokshahi News

संपूर्ण महाराष्ट्राचे हृदय जिंकलेले व्यक्तिमत्व म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. आज त्यांचा स्मृतीदिन..जीवनात यशस्वी होण्यासाठी बाळासाहेबांनी एकाच गोष्टीचा उल्लेख नेहमी केला, माणसाचा आत्मविश्वासच माणसाला यशस्वी करत असतो, माणसाचे आत्मबल नेहमी मजबूत असणे आवश्यक आहे. चला, तर त्यांच्या प्रेरणादायी विचारांना उजाळा देऊयात…


● जीवनात एकदा निर्णय घेतला की, मागे फिरू नका. कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही.
● तुमच्याकडे आत्मबल असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला मरण नाही.
● पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना पायाखाली तुडवायला माझ्या आदेशाची वाट पाहू नका.
● मला जे देश हिताचे असेल ते मी करत राहणार मला खटल्यांची पर्वा नाही.
● माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे भीती नावाचा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
● मुंबई आपली आहे आपली, इकडे आवाजही आपलाच हवा.
● वयाने म्हातारे झाले तरी चालेल पण विचाराने कधी म्हातारे नका होऊ.
● एकजुटीने राहा जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल.
● नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे होऊ, ही महत्वकांक्षा बाळगा.
● तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा पण न्याय मिळालाच पाहिजे.

महायुतीसह मविआमध्ये उमेदवारी अर्जासाठी लगबग

Shrikant Shinde: "राज ठाकरेंचे विचार हे शिवसेनेचे विचार"

काँग्रेसमध्ये नाराज असलेले काँग्रेस नेते आबा बागुल आजपासून रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात सक्रिय

Sanjay Raut : फडणवीस लवंगी फटाक्याइतकाही स्फोट करु शकत नाहीत

Sanjay Raut : निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा ?