Congress Team Lokshahi
ताज्या बातम्या

राजकीय भूकंप; गोव्यात काँग्रेस आमदारांचा 'शिंदे पॅटर्न'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाची मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर अनेक धक्के महाविकास आघाडीला बसत आहेत.राजकारणातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. प्रत्येकजण एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde ) नावाची मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर अनेक धक्के महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) बसत आहेत.राजकारणातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. प्रत्येकजण एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर अजून एक राजकीय भूकंप झाला आहे. गोव्यातून अशी माहिती मिळत आहे की, गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली असून अकरापैकी दहा आमदार विधिमंडळ गट भाजपात विलीन होण्याच्या तयारीत आहेत. भाजप (bjp) श्रेष्ठींकडून या विलिनीकरणाला हिरवा कंदील मिळाला असून आज संध्याकाळपर्यंत दहा आमदारांचा हा गट भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याची माहिती भाजपच्या एका स्थानिक वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली आहे.

लोबो यांच्यासोबत भाजप प्रवेशाच्या तयारीत दिलेल्या आमदारांमध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश आहे. भाजप प्रवेशानंतर त्यांना राज्यसभेवर स्थान दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गोवा विधानसभेत (Goa Legislature) सध्या काँग्रेसचे (Congress) अकरा आमदार आहेत. पक्षांतर बंदी कारवाई टाळण्यासाठी दोन तृतीयांश आमदार फुटीची आवश्यकता आहे. आठ आमदार पुरेसे होते, परंतु येथे ११ पैकी १० आमदार भाजपप्रवेशाच्या तयारीत आहेत. अशी माहिती मिळत आहे.

गोवा विधानसभेचे (Goa Legislature) पावसाळी अधिवेशन उद्या सोमवार ११ जुलैपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडून देणाऱ्या हालचाली विरोधी काँग्रेसची आमदारांमध्ये गतिमान झाल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा