ताज्या बातम्या

लग्नात वाजणार GSTचे सनई-चौघडे, गार्डनपासून फोटोपर्यंत सर्व GSTच्या कक्षेत

Published by : Team Lokshahi

तुमचं - आमचं जगणं दिवसेंदिवस महाग होतंय... अलीकडेच अन्नधान्य, दूध, दह्यावर GST लागल्यानंतर सामान्य महागाईने घायाळ झालाय... आता हे कमी म्हणून की काय लग्नावरही GST ची कुऱ्हाड कोसळलीय... तुम्ही लग्न करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे....समजा लग्नात वेगवेगळ्या सेवांसाठी तुमचा 10 लाखांचा खर्च होत असेल, तर दीड लाखाहून अधिक जीएसटी भरावा लागेल... सर्वात जास्त 18 टक्के जीएसटी लग्नाच्या गार्डनवर आकारण्यात आलाय...

लग्नाच्या या खर्चावर जीएसटी

लग्नपत्रिका : 18 टक्के

कपडे व फूटवेअर : 5 ते 12 टक्के

ब्यूटी पार्लर : 18 टक्के

लग्नाचे गार्डन : 18 टक्के

लग्नाचे टेंट : 18 टक्के

लायटिंग : 18 टक्के

डेकोरेशन : 18 टक्के

बँड बाजा : 18 टक्के

फोटो-व्हिडिओ : 18 टक्के

घोडा- बग्गी : 18 टक्के

सोन्याचे दागिने : 3 टक्के

बस-टॅक्सी सर्व्हिस : 5 टक्के

लग्नावर 5 लाखांचा खर्च झाल्यास 75 हजार रुपये फक्त जीएसटीचे भरावे लागतील. 10 लाखांवर खर्च गेल्यास दीड लाखांहून अधिक जीएसटी भरावा लागेल. यामुळे वधू पित्याची चिंता वाढली आहे. लग्नासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूवर करआकारणी होणार असल्याने लग्नात जीएसटीचेच सनई-चौघडे वाजणार असल्याचे दिसते..

Shrikant Shinde: "राज ठाकरेंचे विचार हे शिवसेनेचे विचार"

काँग्रेसमध्ये नाराज असलेले काँग्रेस नेते आबा बागुल आजपासून रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात सक्रिय

Sanjay Raut : फडणवीस लवंगी फटाक्याइतकाही स्फोट करु शकत नाहीत

Sanjay Raut : निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा ?

किरण सामंत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?