ताज्या बातम्या

हसन मुश्रीफ आज ईडीसमोर हजर राहणार नाहीत

Published by : Siddhi Naringrekar

हसन मुश्रीफ आज ईडीसमोर हजर राहणार नाहीत आहेत. मुश्रीफ यांना हजर राहण्यास ईडीने नोटीस बजावली होती. मात्र आता अशी माहिती मिळत आहे की, ईडीसमोर हजर राहणार नाही आहेत. हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी शनिवारी ईडीकडून तब्बल साडे नऊ तास छापेमारी केली गेली. दीड महिन्यांत तिसऱ्यांदा मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘सरसेनापती संताजी घोरपडे’ कारखान्याशी निगडीत कर्ज प्रकरण ईडीकडून हसन मुश्रीफ यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीने हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावले असून आज ईडी कार्यालयात त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत.  

मुश्रीफ वकिलांमार्फत आपली बाजू ईडीसमोर मांडणार असल्याची माहिती मिळत आहे.

सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सूचना

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Lottery: मनमाडमधील ग्राहकाने जिंकली ७ लाख रुपयांची लॉटरी

Varsha Gaikwad : जनता जाणतेय यावेळेला महाविकास आघाडीला निवडून द्यायचं आहे

प्रसिद्ध गायक नंदेश उमप निवडणुकीच्या रिंगणात