Abasaheb Patil
Abasaheb Patil  Team Lokshahi
राजकारण

मराठा समाजाला आरक्षण द्या, मगच नोकर भरती करा; आबासाहेब पाटलांचे उद्यापासून उपोषण

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं तब्बल आठ हजार 169 पदांसाठी जाहिरात काढली आहे. परंतु, मराठा समाजाला आधी आरक्षण द्या, मगच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नोकर भरती सुरु करा यांसह विविध मागण्यासाठी उद्या सकाळी 11 वाजल्यापासून आझाद मैदान येथे मराठा समाजाचे नेते आबासाहेब पाटील उपोषणाला बसणार आहेत. या संदर्भात आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळवले आहे.

सरकारच्या वतीने राज्यभरामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये 75 हजार मेगा भरती सुरू केलेली आहे. यामध्ये मराठा समाजातील युवकांचा विचार केला गेला नाही. त्याचप्रमाणे 20 जानेवारी रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 8169 उमेदवारांची नोकर भरती जाहीर केलेली आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी 25 जानेवारीपासून अर्ज स्वीकारण्याची घोषणा केलेली आहे.

परंतु, यामध्ये आरक्षण नसल्याने मराठा समाजाला 13 टक्के प्रमाणे जागा दिलेल्या नाहीत किंवा कोणतेही स्थान दिलेले नाही. यामुळेच सदर भरती तात्काळ थांबवण्यात यावी. त्याचप्रमाणे आरक्षण नसल्याने विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 13 टक्के हक्काच्या जागा दिलेल्या नाहीत किंवा शासन नोकर भरतीमध्ये मराठा समाजातील युवकांना स्थान दिलेले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 8169 पदाची भरती तात्काळ थांबविण्यात यावी. आता जर नोकर भरती झाली तर मराठा समाजातील युवकांना अल्प प्रमाणात संधी मिळेल. राज्यभरात मोठी मेगा भरती होईल. परंतु, यामध्ये मराठा समाज नोकर भरतीमधून बाहेर पडेल, अशी भीती आबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली आहे.

मागील काळातील म्हणजे 2014 पासून ते 2022 पर्यंत राज्यातील भरती प्रक्रियेत रखडलेले उमेदवारांना आद्यपर्यंत हजर करून घेतले गेले नाही. यातील फक्त 1064 उमेदवारांना अधिसंख्य पदे निर्माण करून समाविष्ट करून घेतले. परंतु, त्या भरती प्रक्रियेमध्ये नोकर भरतीचा निकाल राखून ठेवल्याने हजारो युवकांना संधी मिळाली नाही. त्या सर्व उमेदवारांवर अन्याय झाला. नागपूर अधिवेशनात अधिसंख्य पदे निर्माण केली. त्याचा शासन निर्णय अद्यापपर्यंत केला नाही. अधिसंख्य पदाचा शासन निर्णय तात्काळ जाहीर करा. त्याचप्रमाणे 21 नोव्हेंबर रोजी एसईबीसी ते ईडब्लूएसचा शासन निर्णय झाला. त्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या भोंगळ करभारामुळे एमपीएससीचे राज्यसेवेचे व इतर विभागातील सर्व विद्यार्थी अडकले गेले या सर्व विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

सध्या राज्यात 52 टक्के आरक्षण असून 10 टक्के ईडब्लूएस आरक्षण एकूण 62 टक्के आरक्षण असून पुन्हा या आरक्षणातील उमेदवार खुल्या वर्गातील 30 टक्के जागा घेतात. यातून सर्व 92 टक्के जागा आरक्षित उमेदवारांना जातात. मग, उर्वरित 8 टक्के जागा शिल्लक राहतात. यामध्ये मराठासह खुल्या वर्गातील उमेदवारांवर खूप मोठा अन्याय होत आहे. यामुळे शासन सेवेतील मराठा समाजातील टक्का घसरलेला असून तो पूर्ण करण्यासाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी. मराठा समाजाला हक्काच्या जागा देऊन नोकर भरती करावी, अशी मागणी आबासाहेब पाटील यांनी केली आहे.

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा

Daily Horoscope 29 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 29 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

फडणवीसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना धाराशिवमध्ये धरलं धारेवर; म्हणाले, "मोदींच्या ट्रेनमध्येच..."

T20 World Cup Selection : धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलचा पत्ता कट? भारतीय संघात 'या' दिग्गज खेळाडूंची केली निवड