राजकारण

निवडणुकीची ट्रायल मॅच होऊनच जाऊ दे; सत्तारांचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. अनेक पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत मातीमोल झाली. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. डबल नुकसान झाले आहे. ते त्यांना दिले जाईल असा निर्णय घेतला आहे. ४ हजार ते साडेचार हजार कोटी मदत दिली आहे. अजूनही मदत देणार आहे. अंतिम आकडेवारी आल्यावर पंचनामा झाले की सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. कोणीही वंचित राहणार नाही सर्वांना मदत देणार आहे, असे त्यांनी सांगितले.

विरोधकांकडून सातत्यांने ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केली जात आहे. यावर बोलतना सत्तार म्हणाले, ओला दुष्काळाची मागणी करणं विरोधी पक्षाचे काम आहे. ठाकरे बाप-लेक दोघांचे दौरे पाहिले. अडीच तासात दौरा केला. बांधावर जाऊन त्यांना ओला दुष्काळ २४ मिनिटात कळला, असा टोलाही त्यांनी उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांना आताही माझं आव्हान आहे. तुम्ही तुमच्या ठिकाणाहून आणि मी माझ्या सिल्लोड ठिकाणाहून लढतो. दोघे राजीनामे देऊन लढू. टेस्ट मॅच आधी ट्रायल मॅच असते ती आपल्या दोघांत होऊ द्या. मग, दुध का दूध पाणी का पाणी एकदाच होईल. आणि मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तर मी राजीनामा देईल. आठवड्यातच माझा निर्णय कळेल, असे अब्दुल सत्तार यांनी म्हंटले आहे.

Bhandara : भंडारा शहरातील खड्यात रांगोळी काढून आंदोलन

Chhagan Bhujbal : अनधिकृत होर्डींग लावणारे भावेश भिडे ठाकरेंच्या जवळचे असल्याचा आरोप, भुजबळांची प्रतिक्रिया

Hording Collapse Mumbai: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे पालिका प्रशासनाची अनधिकृत होर्डिंग्सवर धडक कारवाई

Ravindra Dhangekar: आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?

Salman Khan Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणामधून सहाव्या आरोपीला अटक