राजकारण

सत्ताधारी पक्षाला पदवीधरमध्ये स्वत:चा उमेदवार नव्हता अन् पुण्यात...; अजित पवार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आज सभागृहात आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. नाशिक व नागपूर पदवीधर निवडणूक तसेच कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीवरुन अजित पवारांनी सभागृहात जोरदार टोलेबाजी केली. सत्ताधारी पक्षाला पदवीधरमध्ये स्वत:चा उमेदवार नव्हता. पुण्याचा निकाल लागल्यावर आहे तेही जाणार आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

तुम्ही सहा-सात महिने काय केले ते सांगताय. खरोखर दिवा लावला असता तर पदवीधर-शिक्षकांनी निवडून दिले असते. सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारले. नागपूर, अमरावती, मराठवाड्यात, खान्देशातही भाजपचा पराभव झाला. सत्ताधारी पक्षाला पदवीधरमध्ये स्वत:चा उमेदवार नव्हता. पुण्याचा निकाल लागल्यावर आहे तेही जाणार आहेत, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

कसबा-चिंचवड निकाल काय लागेल हे मला सांगता येत नाही. माझ्या मनात मतदारांबद्दल आदर आहे. पण, यामध्ये काय-काय घडले हे मी आता बोलणार नाही. निकाल लागल्यावर चिंचवड-कसबात काय घडलं ते सांगणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणावरूनही अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले आहे. राज्यपालांनी अभिभाषणाची मराठीत करायला हवं होतं. मराठी भाषेची गरीमा राखली गेली असती. सरकारने राज्यपालांना सांगणं गरजेचं होतं. राज्यकर्त्यांची मराठी भाषेबाबत उदासिनता का, असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

"साहेब आजारी पडतात, साहेबांनी घरी थांबावं", उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शरद पवारांना सल्ला

Rahul Gandhi: 'अंबानी टेम्पोने पैसे देतात याचा मोदींना अनुभव' राहुल गांधींचं मोदींना प्रत्युत्तर

Ajit Pawar: पीडीसीसी बँकेतील पैसे वाटपाच्या आरोपावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Income Tax Department: आयकर विभागाची झारखंडमध्ये कारवाई, वाहन तपासणीमधून 45 लाख 90 हजार रुपये जप्त

Mumbai Police: मुंबईत NCB ची मोठी करवाई, ड्रग्ज सिंडिकेट प्रकरणी 5 फरार आरोपींना अटक