राजकारण

'कोयता गँग'ला मोक्का लावा, तडीपार करा, पण... : अजित पवार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोयता गॅंगचा मुद्दा उपस्थित केला आहे. राज्याला 'कोयता गँग'च्या दहशतीतून मुक्त करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच, 'कोयता गँग'ला मोक्का लावा, तडीपार करा, कोणत्याही परिस्थितीत दहशत मोडून काढा, असेही अजित पवारांनी म्हंटले आहे.

पुण्यासह राज्याच्या अनेक शहरे आणि उपनगरात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. ही गँग रात्री-अपरात्री रस्त्यांवर हवेत कोयता परजत फिरते. महिलांचे दागिने लुटणे, चोरी, लुटमारी करणे, गाड्यांची मोडतोड, जेवणाचे बिल न भरता हॉटेलमध्ये तोडफोड करण्यासारखे हिंसक कारवाया करते. राज्यातील अनेक शहरातील नागरिक कोयता गँगच्या दहशतीखाली जगत आहेत. कोयता गँगचे वाढते लोण रोखण्यासाठी, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी. त्यासाठी या गँगच्या गुन्हेगारांना मोक्का लावा, तडीपार करा. त्यांची दहशत कोणत्याही परिस्थितीत मोडून काढा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केली.

विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे कोयता गँगच्या दहशतीचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. यावेळी अजित पवार म्हणाले की, पुणे शहर व आसपासच्या उपनगरात 'कोयता गँग'ची दहशत आहे. पुणे परिसरातल्या मांजरी बुद्रुक, भेकराईनगर, गंगानगर, मुंढवा रस्ता, हडपसर भागात कोयता गॅंगच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील अनेक शहरात व उपनगरात हीच परिस्थिती आहे. कोयता गँगचे लोण इतर शहरातही वाढत आहे. या गँगकडून रस्त्यावर कोयते परजत दहशत निर्माण केली जात आहे. दहशतीच्या जोरावर 'कोयता गँग'चे गुंड वर्चस्व निर्माण करत आहेत. कोयता गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश हा सुद्धा गंभीर मुद्दा आहे. हे तरुण रात्री-अपरात्री रस्त्यावर हवेत कोयते परजत फिरतात. चोऱ्या करतात. महिलांचे दागिने लुटतात, ज्येष्ठ नागरीकांना लुटतात, हॉटेलमध्ये जेवण करुन बीलाचे पैसे न देता हॉटेल चालकांना मारहाण करतात, गाड्यांच्या काचा फोडतात. असे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे राज्यात भीतीचे वातावरण आहे. कोयता गँगची ही दहशत मोडून काढण्यासाठी या गँगमधील गुन्हेगारांवर मोक्का लावा, त्यांना तडीपार करा आणखी कडक कारवाई करा, अशी मागणी अजित पवार यांनी सभागृहात स्थगन प्रस्तावाद्वारे केली.

...म्हणून १९९९ ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Nilesh Rane On Vinayak Raut: माजी खासदार निलेश राणेंची विनायक राऊतांवर टीका

महायुतीसह मविआमध्ये उमेदवारी अर्जासाठी लगबग

Shrikant Shinde: "राज ठाकरेंचे विचार हे शिवसेनेचे विचार"

काँग्रेसमध्ये नाराज असलेले काँग्रेस नेते आबा बागुल आजपासून रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात सक्रिय