राजकारण

...तर सभागृहात बेशिस्त वाढेल; पहिल्याच दिवशी अजित पवारांनी फटकारले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाला आहे. कामकाजाच्या सुरुवातीलाच अजित पवारांनी अख्ख्या मंत्रिमंडळालाच झापले. तुम्ही मंत्री आहात. मंत्र्यांनी नवे पायंडे पाडू नका. नाही तर सभागृहात बेशिस्त वाढेल, असे अजित पवार म्हणाले आहेत.

हिवाळी अधिवेशनात काही मंत्री शर्टाच्या खिशाला पक्षाची चिन्हे लावून विधानसभेत आले होते. त्यामुळे अजित पवार चांगेलच संतापलेले पाहायला मिळाले. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. मुख्यमंत्री हा राज्याचा असतो. मंत्रीही राज्याचे मंत्री असतात. ते एखाद्या पक्षाचे मंत्री नसतात. असे असताना आपण ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाचे चिन्हे लावून सभागृहात कोणी येत नाही. पंतप्रधान मोदीही भाषण करताना चिन्ह लावून येत नाहीत. त्यामुळे नवीन पायंडे पाडू नका. नाही तर सभागृहात बेशिस्त वाढेल, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुनही अजित पवार आक्रमक झाले होते. गृहमंत्री अमित शहा यांनी सीमाभागावर वादाबद्दल दिल्लीत बैठक बोलावली होती. मुळात सीमाभागाच्या मुद्यावर कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. 6 डिसेंबरला चंद्रकांत पाटील आणि शंभुराजे देसाई सीमाभागात जाणार होते. पण, महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे त्यांनी टाळले. त्यानंतर कर्नाटकमध्ये कुणाला अडवणार नाही, असे अमित शहांसमोर ठरले होते. मग, आज आमदारांना कर्नाटकने का रोखलं, हे अजिबात आपण खपवून घेऊ नये, असे त्यांनी म्हंटले आहे.

Rohit Pawar : देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

महाविकास आघाडीतील सांगलीच्या वादावर रोहित पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा