ram mandir amit shah
ram mandir amit shah Team Lokshahi
राजकारण

अयोध्येतील राम मंदिर कधी होणार तयार? अमित शहांनी तारीखच सांगितली

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील निर्माणाधीन राम मंदिराचे उद्घाटनाची तारीख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घोषित केली आहे. राम मंदिर १ जानेवारी २०२४ रोजी सर्वांसाठी खुले होणार आहे. जनविश्वास यात्रेच्या सभेत अमित शहा यांनी ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे देशात २०२४ मध्येच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीखही भाजपच्या मतांच्या राजकारणाशी जोडली जात आहे.

अमित शहा म्हणाले की, 2019 मध्ये राहुल गांधी विचारायचे मंदिर कधी बांधणार? मला त्यांना सांगायचे आहे, कान उघडून ऐका १ जानेवारी २०२४ रोजी तुम्हाला अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर तयार झालेले दिसेल. तुम्ही सर्व तिकीट काढून ठेवा, असे त्यांनी तेथे उपस्थित लोकांना सांगितले. काँग्रेसने न्यायालयात राम मंदिराच्या उभारणीत अडथळे आणले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

अनेक दशके जुना प्रश्न सोडवत सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन केले आणि मंदिराची पायाभरणी केली. मंदिर उभारणीची पायाभरणी होताच भाजपच्या राम मंदिराच्या आंदोलनाला मूर्त रूप आले. पुढील वर्षी अयोध्येत राममंदिर तयार करून घेऊ, असे अमित शहांनी म्हंटले आहे.

दरम्यान, राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर पंतप्रधान मोदींनी उपस्थित लोकांना संबोधित केले. पीएम मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात जय श्री रामच्या घोषणांनी केली. ते म्हणाले होते की, जय सिया रामचा नारा आज केवळ अयोध्येतच नाही तर संपूर्ण जगात गुंजत आहे. आज शरयूच्या काठावर एक सुवर्ण अध्याय लिहिला जात आहे. आज शतकानुशतकांची प्रतीक्षा आज संपत आहे, असे त्यांनी म्हंटले होते.

Wedding Rituals: लग्नात का चोरतात नवरदेवाचे बूट? रंजक आहे यामागचं कारण

"त्या पदावरून शरद पवार बाजूला गेले आणि..." बारामतीच्या सभेत अजित पवारांनी सांगितला मोठा किस्सा

Sahil Khan Arrested : छत्तीसगड येथून अभिनेता साहिल खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं

International Dance Day 2024: आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस कधीपासून साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

"नुसतं उभं राहण्यात मजा नाही, पाडण्यात सुद्धा मोठा विजय आहे"; पत्रकार परिषदेत मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं