Narayan Rane | Uddhav Thackeray
Narayan Rane | Uddhav Thackeray  Team Lokshahi
राजकारण

'उद्धवा, काय केलंय, रे बाबा अडीच वर्षात' फडणवीसांसमोरच राणेंची ठाकरेंवर बोचरी टीका

Published by : Sagar Pradhan

आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर होते. यावेळी आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांची त्या ठिकाणी सभा झाली झाला. याच सभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित होते. याच सभेत बोलत असताना नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

काय म्हणाले नारायण राणे?

सभेत बोलताना राणे म्हणाले की, मी शिवसेनेतून सुरुवात केली. नंतर काँग्रेसमध्ये होतो. आता भाजपात कायम राहणार. कुणाशी दगाफटका करणं आमची सवय नाही, उद्धवा, काय केलंय, रे बाबा अडीच वर्षात. आलास दोनदा मासे खायला. एकतरी प्रकल्प कोकणाला दिला का. कोकणात प्रकल्प येताच त्याला विरोध केला जात होता. एंरॉन प्रकल्प आला. त्याला शिवसेनेनं विरोध केला. एंरॉनमध्ये काम कोणी घेतली. गाड्या कोणाच्या होत्या. कंत्राटदार कोण होते. त्यात राजन साळवी कंत्राटदार होते, असा आरोपही यावेळी नारायण राणे यांनी केला.

पुढे ते म्हणाले की, मला फटाके काढता येतात. काढेन तेव्हा पळता भूई थोडी होतील. मी भाजपमध्ये आलो ही माझी अडचण आहे. येथे सहनशील, शांत विचारसरणीचे सगळे लोकं आहेत. आपणही त्याच्यातच बसतो. तसं व्हायला पाहिजे. तसं दाखवायला पाहिजे. म्हणून कृती करतो. याचा फायदा घेऊ, नाणारच्या गावात किती जागा घेऊन ठेवल्या. आमची कोणत्या प्रकल्पात कोणती जागा आहे का सांगा. बाळासाहेबांनंतर शिवसेना फक्त टक्केवारी करणारी आहे. मुंबई महापालिका २५ वर्षे लुटली. संसार उभारले. देश-परदेशात गुंतवणूक केली, असा आरोपही नारायण राणे यांनी केला.

रक्तात शिवसेना भिनवली योग्य वेळी मी बोलेन

कोकणी माणसानं घाम गाळून शिवसेनेची सत्ता मुंबईत आणली. राज्यात शिवसेना नेली. त्या कोकणी माणसाकडे अडीच वर्षात कोणी पाहिलं नाही, कसली शिवसेना मी ३९ वर्षे जवळून पाहिली. रोज ७ नंतर साहेबांसोबत बसायचो. नुकती पाहिली नाही. अनुभवली. रक्तात शिवसेना भिनवली होती. योग्य वेळी मी बोलेन. केंद्रात कुणालाही फोन केला. तरी ते मंत्री मला एस सर म्हणतात. मी सांगितलेलं काम करतात, असंही नारायण राणे यांनी सांगितलं.

Nilesh Rane On Vinayak Raut: माजी खासदार निलेश राणेंची विनायक राऊतांवर टीका

महायुतीसह मविआमध्ये उमेदवारी अर्जासाठी लगबग

Shrikant Shinde: "राज ठाकरेंचे विचार हे शिवसेनेचे विचार"

काँग्रेसमध्ये नाराज असलेले काँग्रेस नेते आबा बागुल आजपासून रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात सक्रिय

Sanjay Raut : फडणवीस लवंगी फटाक्याइतकाही स्फोट करु शकत नाहीत