राजकारण

दिलासादायक बातमी! टाटा ग्रुप नागपूरमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक; अध्यक्षांचे गडकरींना पत्र

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कल्पना नालस्कर | नागपूर : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरला होणारा टाटा-एअरबसचा प्रकल्प आता गुजरातला होणार आहे. यावरुन सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलं असून आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. अशातच राज्यासाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. नागपूरला टाटा समुहाचं हब बनवण्याची विनंती करणारे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांना लिहिलं होते. या पत्राला आता उत्तर दिले असून टाटा समूह मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास तयार असल्याचं नटराजन चंद्रशेखर यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले होते नितीन गडकरी?

नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांना पत्र पाठवून नागपुरातील मिहानमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचे सांगत त्यांचे  लक्ष वेधलं होतं. टाटा सन्सच्या  विस्तारासाठी टाटा आवश्यक पायाभूत सुविधा मिहानमध्ये उपलब्ध आहेत. महामार्ग, रेल्वे तसेच विमानसेवा उपलब्ध आहे. त्यामुळे टाटा समुहातर्फे टाटा स्टील, टाटा मोटर्स, टायटन इंडस्ट्री, व्होल्टास लिमिटेड असे विविध प्रकल्प मिहानमध्ये उभारले जाऊ शकतात, असे गडकरी यांनी पाठवलेल्या पत्रात सांगण्यात आले होते.

टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांनी दिले उत्तर

यावर टाटा समूह मिहान मध्ये गुंतवणूक करण्यास तयार असल्याचं टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांनी नितीन गडकरी यांना पत्र पाठवून सांगितले आहे. मिहानमध्ये उद्योग पायाभरणीच्या संधीबाबत विदर्भ इकोनॉमिक डेव्हलपमेंट काऊंसिल वेदने एक आराखडा तयार केला आहे. लवकरच आमची टीम नागपूर येथे येऊन मिहान येधील उद्योग विस्ताराच्या संदर्भात सर्व्हे करेल, असे नटराजन यांनी पत्रात सांगतिले आहे.

दरम्यान, टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क या दोन प्रकल्पानंतर तिसरा प्रकल्प राज्याबाहेर गेला होता. यापाठोपाठ सॅफ्रोन हा प्रकल्पही राज्याबाहेर गेल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर चहुबाजूने टीका सुरू झाली आहे.

Dhananjay Munde : ऐतिहासिक मतांनी पंकजाताई निवडून येतील, असा विश्वास मला आहे

Heena Gavit : हिना गावित यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाल्या...

Ravindra Dhangekar : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर रविंद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Dilip Walse Patil : नागरिकांनी सजग राहून मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे

Satyajeet Tambe : देशाच्यादृष्टीने अतिशय महत्वाची ही निवडणूक आहे, देशाचं सरकार आपल्याला निवडायचं आहे