Devendra Fadnavis | Uddhav Thackeray
Devendra Fadnavis | Uddhav Thackeray  Team Lokshahi
राजकारण

"काही लोकांच्या बैईमानीमुळे त्यावेळी डबल इंजिनचे सरकार पडले" फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

Published by : Sagar Pradhan

महाराष्ट्रात झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आज मुंबई नुकताच मुंबईत दाखल झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केल्यानंतर बिकेसी मैदानात सभा पार पडत आहे. त्याच सभेत पहिल्यांदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

बीकेसी येथील भाषणात बोलत असताना फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी सगळीकडंच लोकप्रिय आहेत जर तुनच्या लोकप्रियतेची स्पर्धा असते, तर मुंबईच पहिली आली असती. एवढे प्रेम मुंबईकरांचे आहे. 2019 मध्ये तुम्ही पाच वर्षांची डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राला बदलेले आहे, असे तुम्ही म्हणाले होते. परंतु, तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून डबल इंजिन सरकार जनतेने आणली. परंतु, काहींनी बेईमानी केली. यामुळे अडीच वर्ष जनतेच्या मनातील सरकार बनू शकले नाही. बाळासाहेबांचे सच्चे अनुनायी एकनाथ शिंदे यांनी हिंमत दाखवली. आणि महाराष्ट्रात जनतेच्या मनातील सरकार आली. महाराष्ट्र विकासाच्या दिशेने धावू लागली. असे फडणवीस यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, आपण आज अनेक कार्यक्रमांचं उद्घाटन करणार आहोत. राजकारण कसं असतं? कोविड काळात पंतप्रधान मोदींनी रस्त्यावर ठेला लावणाऱ्यांचा विचार केला. पण त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. त्यांनी गरिबांसाठी जी योजाना आणली ती योजना स्थगित केली. आम्ही आमचं सरकार आणल्यानंतर मुंबईतील १ लाख ठेला लावणारे, फेरीवाले आणि छोट्या दुकानदारांना त्याचा फायदा होईल. मुंबईसह इतर ठिकाणीही ते होईल, अशी माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Rohit Pawar : देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

महाविकास आघाडीतील सांगलीच्या वादावर रोहित पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा