राजकारण

शिंदेंच्या भाषणावेळी डुलक्या काढण्यावर केसरकर म्हणाले, झोपलो नव्हतो तर...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसीवर पार पडला. या मेळाव्याला लाखो लोकांची गर्दी होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांनी तब्बल 1 तास 48 मिनीटे भाषण केले. यादरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांना स्टेजवरच डुलकी लागल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. यावर आता दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या भाषणादरम्यान दीपक केसरकरांना डुलकी आल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांनी निशाणा साधला होता. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांनी कालच्या मेळाव्यासाठी शिंदे गटातील आमदारांनी अपार मेहनत घेतली होती, त्यामुळे केसरकरांना व्यासपीठावरच झोप लागली होती, अशी टीका केली होती. तर, केसरकर यांना एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी डुलकी लागली नव्हती, तर ते हिंदुत्वाची काळजी करत आत्मचिंतन करत होते, असा टोला राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी लगावला होता.

यावर आज दीपक केसरकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, दसरा मेळाव्यात मी झोपलो नव्हतो तर विचार करत होतो. मी झोपलो असतो तर माझे हात कसे हलले असते, असा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला आहे.

दरम्यान, उध्दव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर केसरकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, उद्वव ठाकरेंच्या भाषणातील वक्तव्यांमुळे मी अस्वस्थ झालो आहे. डुक्कर ही भाषा संजय राऊतांच्या तोंडी शोभते. उद्वव साहेबांच्या तोंडी शोभत नाही. एकनाथ शिंदेंचा मला अभिमान आहे. त्यांच्याबद्दल उद्वव ठाकरे जे बोलले त्यामुळे मी अस्वस्थ आहे. मला रात्र-रात्र झोप लागत नाही. त्यासाठी मी शिर्डीला जाऊन दर्शन घेऊन मन शांत करुन आलो, असे त्यांनी म्हंटले आहे.

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा