राजकारण

लोकशाहीमध्ये काविळ झाल्यासारखे वागणं बरं नाही; फडणवीसांनी विरोधकांना सुनावले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले असून संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. तर, संसदेचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.

लोकशाहीमध्ये काविळ झाल्यासारखे वागणं बरं नाही. संसद भवन ही देशाची ताकद आहे. कमी वेळेत भव्यतेने बनले आहे, जगासमोर भारताची ताकद आली आहे. पण, मोदींच्या विरोधाचा ज्वर चढल्याने लोकसभेच्या मंदिराची पायरी चढायला तयार नाहीत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले.

तर, याआधीही इंदिरा गांधी यांनी लोकसभेच्या एनेक्स बिल्डींगचे व राजीव गांधी यांनीही संसदेतील ग्रंथालयाचे अनेक उद्घाटन केले होते. पण, त्यावेळी कधीही विरोध केला नाही. ज्या भव्यतेने संसद भवन तयार झालं ते यांना पचत नाही, अशीही टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, आप नेते अरविंद केजरीवाल यांनी उध्दव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. यावरही देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे. केजरीवाल आणि ठाकरे यांची भेट झाल्याचा अतिशय आनंद आहे. भाजला पराभूत करण्यासाठी केजरीवाल कोणाशीही तडजोड करायला तयार होतील. तर, उद्धव ठाकरे कुणाच्याही बाजुला बसायला तयार झालेत. याआधीही असा प्रयत्न केला होता. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही, असा निशाणा फडणवीसांनी साधला आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...