राजकारण

फडणवीसांच्या भेटीवर आशिष देशमुखांची प्रतिक्रिया; कालचे विरोधक, आज मित्र....

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कल्पना नलसकर | नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षातून निलंबित नेते आशिष देशमुख यांची त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून आगामी निवडणूक आशिष देशमुख भाजपच्या तिकीटावर लढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर आशिष देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आज नाश्ता करण्यासाठी आले होते. आणि जरी 2019 मध्ये मी त्यांचा विरोधात निवडणूक लढली होती. पण, राजकारणामध्ये कोणीही कायमचा शत्रू नसतो. कालचे विरोधक होते ते आज मित्र असतात. यासाठी चांगली भेट अशी झाली. चांगला असा नाष्टाचा आस्वाद आमच्याकडे घेतला, असे आशिष देशमुख यांनी सांगितले आहे.

भाजपमध्ये जाणार का? प्रश्नावर ते म्हणाले, मी काँग्रेसमध्ये आहे. मला नोटीस आली होती. मी त्याला सविस्तरपणे उत्तर दिले आहे. आणि मला शंभर टक्के खात्री आहे की काँग्रेस पक्ष मला काढणार नाही. पण, पक्ष विरहित राजकीय संस्कृती महाराष्ट्रमध्ये आहे. म्हणून जे आपले जिवलग मित्र असे देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत म्हणून ते आज ते माझ्या घरी आले होते. पक्षापलीकडे संबंध असतात, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

तर, मी काँग्रेसमध्येच असून फक्त निलंबित आहे. ज्या पद्धतीने सतीश चतुर्वेदी यांचं निलंबन मागे करून ॲक्टिव्ह करण्यात आले होते. ती अपेक्षा मला आहे. 2009 मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मी लढलो होतो. 2014 मध्ये अनिल देशमुख यांचा पराभव केला. पण, हे विसरून चालला नाही की 2019 ची निवडणुक अतिशय महत्वाची होती. मी नवख्या अशा विधानसभा क्षेत्रामधून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढलो होतो आणि तगडी टक्कर त्यांना दिली होती. काही मतांनीच माझा पराभव झाला होता. म्हणून आज तरी मी पक्ष बदलण्याचा प्रश्न उद्भवत नाही. फक्त नाश्ता करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आले होते, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, फडणवीस यांच्या माध्यमातून विदर्भात विकासाचा कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. त्याचा मी अभिनंदन करतोय. विदर्भाच्या दृष्टीने या संपूर्ण पार्श्वभूमीवरती जर एकमेव काम करणारा व्यक्ती असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. हे जर मी पक्षात दुसरा असल्या तरी सांगत आहे, अशा शब्दांमध्ये आशिष देशमुख यांनी फडणवीसांचे कौतुक केलेले आहे.

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण