राजकारण

Devendra Fadnavis meets Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ'वर भेट

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्यातील राजकारणात सत्तांतर झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलत आहेत. यातच आत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी 'शिवतीर्थ' निवासस्थानी जात मनसे प्रमुख राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेतली आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले संबंध आहेत. शिवसेना-भाजपा यांच्यात दुरावा आल्यानंतर भाजपा-राज ठाकरेंची जवळीक झाली. त्यात आता राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेत आक्रमकपणे भूमिका घेतली आहे. भाजपा-मनसे यांच्यात हिंदुत्वावरून एकमत झाले आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचे आडाखे बांधले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतल्यानंतर आता संपूर्ण राज्याला मंत्रिमंडळ विस्ताराची अपक्षे आहे.

भाजपशी सलगी केल्यानंतर शिंदे गटातील आमदारांना कोणती खाती मिळतात, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना पत्र पाठवलं होते. या पत्रातून राज यांनी फडणवीसांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. खुद्द फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात राज ठाकरेंनी पाठवलेल्या पत्राचा विशेष उल्लेख करत त्यांना फोन करून आभार मानल्याचं सांगितले. त्याचसोबत मी त्यांची सदिच्छा भेट घेणार असल्याचं सांगत त्यातून काही राजकीय अर्थ काढू नका असंही फडणवीसांनी स्पष्ट केले होते.

फडणवीसांच्या या विधानानंतर राज्यातील मंत्रिमंडळात मनसेचाही समावेश असेल अशा चर्चा सुरू झाल्या. कारण मनसेच्या एकमेव आमदाराने विधानसभा अध्यक्ष निवडीत, बहुमत चाचणी आणि आगामी राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाला साथ देणार आहे. त्यामुळे मनसे-भाजपा एकत्र येणार असं बोललं जात आहे.

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं