Dhananjay Desai | Ajit Pawar
Dhananjay Desai | Ajit Pawar  Team Lokshahi
राजकारण

'धरणात लघुशंका करणारे आता इतिहासात लघुशंका करु लागलेत'

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : लव्ह जिहाद, धर्मांतरसह विविध मागण्यांसाठी पुण्यात आज हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये हिंदू राष्ट्र सेना अध्यक्ष धनंजय देसाई यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर विखारी टीका केली आहे. धरणांमध्ये मुतून शेतकऱ्यांच्या ओला जखमांवर जखमा करणारे आता इतिहासात मुतू लागले आहेत त्यांना डायपर घातले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांवलर शरसंधान साधले आहे. तसेच, धर्मवीर न म्हणणाऱ्यांवर बहिष्कार टाका, असेही त्यांनी म्हंटले आहे.

पुण्येश्वर मुक्त करण्यासाठी आंदोलन आहे. पुण्यात आदिलशाहीचा उकिरड्यावरून आलेल्या काही सरदारांनी गाढवाचा नांगर फिरवला होता. गाढवाचं नांगर फिरवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला. धर्मवीर संभाजी महाराज धर्मवीर नव्हते? कदाचित तुम्ही पवार नसू शकाल पण छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते. धरणांमध्ये मुतून शेतकऱ्यांच्या ओला जखमांवर जखमा करणारे आता इतिहासात मुतू लागले आहेत त्यांना डायपर घातले पाहिजे, असा घणाघात धनंजय देसाई यांनी अजित पवारांवर केला आहे.

हा लढा राजकीय नाही हे हिंदू हिताचे राजकारण आहे. दीड दमडीच्या राजकीय नेत्यांनी आम्हाला धर्माची व्याख्या सांगू नये. शेतकऱ्यांनी कितीही मशागत केली तरी काँग्रेस उगवतच त्याला वारंवार खुरपावे लागते. तसे आदिलशाईने जो गाढवाचा नांगर फिरवला तो बारामतीपर्यंत गेला आणि तिथे हरामखोर पिलावळ जन्माला आली, असा निशाणा त्यांनी पवार कुटुंबीयांवर साधला आहे.

आम्हाला पक्षांची लंगोट नेसायची नाही आम्हाला जिहादी यांचा गर्भ मारायचा आहे. महाराष्ट्राचा गाभारा विधानसभा आहे. या विधानसभेत जिहाद्यांचे राजकीय पोशिंदे, नवाब मलिक, अस्लम शेख, याकूब मेमन यांचे पोशिंदे जर विधान सभेत जाणार असतील तर आपल्या पितृदेवांचा तो अपमान आहे, अशीही टीका धनंजय देसाई यांनी केली आहे. हैदराबाद हे तेच लोक म्हणतात ज्यांच्या घरी हैदर अली गेला होता नाहीतर ते भाग्यनगर आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात जाहीर सभा; धैर्यशील माने यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Balya Mama Mhatre : या देशात एक परिवर्तनाची लाट तयार झालेली आहे

महायुतीतील जागावाटपाचा तिढा आज सुटणार?

Sankashti Chaturthi 2024: संकष्टी चतुर्थी व्रत उपासना पद्धत; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

Daily Horoscope 27 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांनी थोडं सावध राहा; पाहा तुमचे भविष्य