राजकारण

आम्हाला राजकारण करायचं नाही; एकनाथ शिंदेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मागील काही दिवसांपासून अधिकच चिघळत चालला आहे. या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत ते ट्विटर अकाऊंट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा नसल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता. यावरुन विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, काल केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्याला वेळ देऊन सीमा प्रश्नाला गांभीर्याने दाखल घेतली. यापूर्वी बोम्मई यांच्या ट्विटमुळे गैरसमज होत होते आणि भावना दुखावल्या जात होत्या. पण त्यांनी स्पष्ट केले कि ते फेक ट्विट होते. याची दखल केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली आहे. आम्हाला याचं राजकारण करायचं नाही. विरोधकांना टीका करत राहू द्या, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सहा वर्षांपूर्वीचा कोळीवाड्यातील बांधवांचा प्रश्न मार्गी लावला. कोस्टल रोडच्या ब्रिजच्या दोन पिल्लर मधलं अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मच्छीमारांचा प्रश्न मिटला. तसेच सीमांकनाचा आणि गावठाणाचा प्रश्न मार्गी लावला. हे भूमिपुत्रांचं सरकार आहे. विकास करताना स्थानिकांवर अन्याय होणार नाही. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणार आणि तोडगा काढणार. यामध्ये साडे सहाशे कोटींचा अधिकचा खर्च होणार असला तरी लोकांना न्याय देणार आहे. 120 मीटरचा गॅप वाढवणार असून युद्धपातळीवर काम करणार आहोत, असे त्यांनी म्हंटले आहे

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आक्रमक ट्वीट केल्यानंतर सीमाभागांत तणाव वाढला. मात्र, बनावट ट्विटर खात्यावरून विधाने प्रसारित झाल्याचा दावा बोम्मई यांनी बैठकीत केला. मात्र आता ज्या ट्विटर अकाऊंट्सवरुन ही ट्वीट केली गेली ती खोटी असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही केला आहे. ही खाती उघडणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई केली जाईल, अशी ग्वाही शहांनी दिली आहे.

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा