राजकारण

50 खोके नाही तर 200 खोके देतो; मुख्यमंत्री शिंदे यांचे विधान

Published by : Shweta Shigvan-Kavankar

उदय चक्रधर | भंडारा : राज्यात खोक्यांवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून शिंदे गटावर सातत्याने खोके घेतल्याचा आरोप केला जात आहे. तर, शिंदे गटही याला प्रत्युत्तर देताना दिसत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः जाहीर सभेत 50 खोके देत नसून 200 खोके विकास कामांकरीता देत असतो, असा टोला विरोधकांना लगावला आहे.

एकनाथ शिंदे शनिवारी भंडारा जिल्ह्याचा दौऱ्यावर होते. सकाळी गोसीखुर्द प्रकल्प पाहणीनंतर त्यांनी आढावा बैठक घेत भंडारा शहरात तब्बल 200 कोटी रुपयांचा विविध कामांचे भूमिपूजन केले. तर या विविध कार्यक्रमानंतर भंडारा येथे त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी तसेच धानाला बोनस जाहीर होणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना आतापर्यंत तब्बल 60 कोटी दिले असल्याचे सांगितले. शिवाय धान उत्पादक शेतकाऱ्याला बोनस प्राप्त व्हावा या करिता उपसमिती नेमली असून त्याचा अहवाल आल्यानंतर या शेतकऱ्यांचा प्रश्न मिटणार असल्याचे सांगितले.

गोसीखुर्द महत्वकांक्षी प्रकल्प अंतर्गत तब्बल अडीच लाख हेक्टर जमीन सिंचन खाली येणार असून येत्या 2025 पर्यंत पूर्णत्वास येणार आहे. शिवाय उद्योग व पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर विरोधकांवर उत्तर देत एकनाथ शिंदे हे 50 खोके देत नसून 200 खोके हे विकास कामांकरीता देतात, असा निशाणा त्यांनी विरोधकांवर साधला आहे.

दरम्यान, याआधी खोक्यांवरुन बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये चांगलीच जुंपली होती. अखेर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करत हा वाद सोडवावा लागला. हा वाद शमत असतानाच सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर खोक्यांवरुन टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना सत्तार यांनी सुळेंना शिवी दिल्याने चर्चेत आले होते. सत्तारांवर मोठ्या प्रमाणात टीका झाल्याने त्यांनी अखेर खेद व्यक्त केला होता.

Sharad Pawar: मतदानाच्या टक्केवारीबाबत शरद पवारांकडून चिंता व्यक्त

...म्हणून १९९९ ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Nilesh Rane On Vinayak Raut: माजी खासदार निलेश राणेंची विनायक राऊतांवर टीका

महायुतीसह मविआमध्ये उमेदवारी अर्जासाठी लगबग

Shrikant Shinde: "राज ठाकरेंचे विचार हे शिवसेनेचे विचार"