राजकारण

महाराष्ट्रद्रोह्यांना वेळीच आवरले नाही, तर…; महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला विराट मोर्चा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांकडून वादग्रस्त विधाने आणि सीमावादाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे. याविरोधात महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यासंदर्भाची माहिती महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेत दिली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रद्रोह्यांना आवरले नाही तर महाराष्ट्र छिन्न-विछिन्न करायलाही हे मागेपुढे बघणार नाही, अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले आहे.

उध्दव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या महापुरुषांचा सातत्याने अपमान केला जात आहे. महाराष्ट्राचे अस्तित्व नाकारण्यात येत आहे. एका बाजूने महाराष्ट्र तोडण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राच्या गावांवर आता बाजुच्या राज्यांनी हक्क सांगायला सुरुवात केली आहे. या विरोधात १७ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरुवात जिजामाता उद्यानापासून होईल आणि सीएसटीपर्यंत हा मोर्चा असणार आहे. हा मोर्चा न भूतो ना भविष्य, असा होणार असल्याती मला खात्री आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

मागील वेळी गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महापालिका या तीन निवडणुका झाल्या. तेव्हा भाजपाने विजय मिळवला होता. मात्र, यंदा हिमाचलमध्ये काँग्रेस, दिल्ली महापालिकेत आप आणि गुजरातमध्ये भाजपाने अभूतपूर्व यश मिळवले आहे. परंतु, गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगाचेही योगदान आहे.

आता कर्नाटकची निवडणूक डोळ्यासमोर घेऊन महाराष्ट्रातील गावंही तोडतील की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वेळीच महाराष्ट्रद्रोह्यांना आवरले नाही तर महाराष्ट्र छिन्न-विछिन्न करायलाही हे मागेपुढे बघणार नाही. त्यांच्या मनात जे विष आहे, ते आता जगजाहीर झालं आहे. त्यामुळे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत, त्यांनी १७ तारखेला मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहनही उध्दव ठाकरेंनी केले आहे.

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण