राजकारण

झिरवळ दांपत्यावर नेटकऱ्यांचा कौतुकाचा वर्षाव; केला सलाम

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अनेकदा सत्तासंघर्षात चर्चेत आलेले पाहायला मिळाले. परंतु, सध्या झिरवळ वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. एका अभ्यास दौरा निमित्त नरहरी झिरवळ आपल्या पत्नीसह जपान येथे गेले आहे. यावेळी एअरपोर्टवरील फोटो त्यांनी ट्विट केला आहे. या फोटोतील साधेपणा नेटकऱ्यांचा पसंतीस उतरला असून झिरवळांचे तोंडभरुन कौतुक केले आहे.

नरहरी झिरवळ आज राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे जपानमध्ये महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांसमवेत अभ्यास दौरा आयोजित केला आहे. यावेळी एअरपोर्टवरी फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. परदेशात जातानाही कोणाताही बडेजावपणा न करता डोक्यावर गांधी टोपी, डोळ्यांवर चष्मा अंगात पांढरा कुर्ता पायजमा असे नरहरी झिरवळ दिसून आले. तर, अत्यंत साध्या ग्रामीण वेशातील काष्टा घातलेल्या झिरवळ यांच्या पत्नीने नेटकऱ्यांची मने जिंकून घेतली. या फोटोवर युजर्सने अक्षरशः कमेंटचा वर्षाव केला आहे.

एका युजर म्हंटले की, किती साधेपणा जपलाय साहेब. खूप भारी फोटो आला आहे साहेब अस्सल महाराष्ट्रीय. तर दुसऱ्याने राजकीय टिप्पणी न करता तुमच्या साधेपणाला सलाम करावा वाटतो. आपल्या मंडळीच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे हे त्याच मोल कुठच होत नाही. आपली संस्कृती सोबत ठेवून तुम्ही जपान पाहताय बरं वाटलं, असे म्हंटले आहे. आणखी एकाने लिहले की, साधी राहणी..उच्च विचारसरणी .. तुमच्यात आम्हाला आमची खरी संस्कृती, परंपरा दिसत आहे. तर, मामी काहीतरी तुमच्याकडून शिकतील ही अपेक्षा, असे म्हणत युजरने टोला लगावला आहे.

Onion Export: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून कांदा निर्यातीला अखेर परवानगी

कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात PM मोदींची तोफ धडाडणार, फडणवीस म्हणाले; "कोल्हापूर असो किंवा महाराष्ट्रातील..."

'इंडिया' आघाडीवर फडणवीसांचं पुन्हा शरसंधान, कडेगावात म्हणाले, "राहुल गांधी, शरद पवार यांना..."

IPL Records : कोलकाता आणि पंजाबच्या सामन्यात पडला षटकारांचा पाऊस, टी-२० मध्ये 'या' ऐतिहासिक विक्रमाला घातली गवसणी

गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी; अमोल कोल्हे म्हणाले...