राजकारण

यूपी आणि बिहारचे रस्ते अमेरिकेसारखे करणार : नितीन गडकरी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मला 2024 पर्यंत यूपी आणि बिहारचे रस्ते अमेरिकेच्या पातळीपर्यंतचे करायचे आहेत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हंटले आहे. नॅशनल हायवेज् इन्फ्रा ट्रस्ट आज मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. त्यावेळी ते बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले की, आपला देश फास्टेस्ट ग्रोईंग देश आहे. भारताची ५ ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचे पंतप्रधान मोदींचं स्वप्न आहे. इनव्हीटचा आमचा पहिला प्रयोग होता. आम्हाला जी रक्कम उभी करायची होती त्यापेक्षा सात पटीनं अधिक रक्कम उभी करण्यात यश आल्याने मला आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच नितीन गडकरींनी एक जुनी आठवणही सांगितली आहे.

बीसईशी माझं जुनं नातं आहे. १९९७ ला मंत्री होतो. तेव्हा एनएचएआयसाठी पैसे उभे करायचे होते. त्यावेळी धीरुभाई अंबानी भेटले होते. ते प्रेमाने म्हणाले, तुम्हाला कोण पैसे देईल. पण, तरीही सी-लिंक धरून ५५ प्रकल्पासाठी इन्व्हेस्टमेंट होत गेली. हे एनएचएआयचे (NHAI)यश आहे. त्यानंतर अंबानींनी बड्या लोकांची ओळख करून दिली आणि म्हणाले जितके पूल हेलिकॉप्टरमधून दिसतायत ते यांनी बांधलेत, असे त्यांनी सांगितले.

याशिवाय आमच्याकडे सध्या अनेक प्रोजेक्ट आहेत. मुंबई, पुणे हायवे हे केवळ कमाई वाढवणारे प्रकल्प आणले जात आहेत. दिल्ली ते जेएनपीटी महामार्गाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. नरिमन पॉईंट ते दिल्ली हे अंतर १२ तासांत पूर्ण करता येणार आहे. नवी मुंबईत बनत असलेल्या विमानतळावर जाण्यासाठी वॉटर टॅक्सी प्रकल्प तयार करत आहेत. याद्वारे ३० मिनिटांत कुठूनही पोहोचता येईल. ५ हजारांहून अधिक टॅक्सी यात असतील. यामुळे रोडवरील वाहतूकही कमी होईल.

तसेच, मला 2024 पर्यंत यूपी आणि बिहारचे रस्ते अमेरिकेच्या पातळीपर्यंतचे करायचे आहेत आणि त्यासाठी पैशांची गरज आहे आणि मी लोकांना गुंतवणूक करण्याचे आवाहन करतो. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही खाजगी कंपनीत गुंतवणूक कराच. पण सरकारी योजनेत सुध्दा गुंतवणूक करा. मी म्हणतो गुंतवणूकदरांनी यात गुंतवणूक करावी, असे आवाहन करतो. या वर्षी आम्ही आमच्या लोकांनी काम करून 6 विश्वविक्रम केले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं

'अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील' अजितदादांच धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांची खरमरीत टीका

'प्रकाश आंबेडकर धनदांडग्यांच्या पाठिशी' प्रकाश शेंडगे यांची टीका