राजकारण

सत्तासंघर्षाच्या निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; कायदेशीर सरकारवर शिक्कामोर्तब

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. 16 आमदरांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. यामुळे शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कायदेशीर सरकारवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब केले असल्याचे शरद पवारांनी म्हंटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना 16 आमदारांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला असला तरी यासाठी कुठलीही कालमर्यादा घातली नाही. राजकीय पक्ष कोण हे अध्यक्ष ठरवणार आहेत. पण, हे ठरवताना शिवसेना पक्षचे संविधान ग्राह्य धरावे लागणार असल्याचे शरद पवारांनी म्हंटले आहे. तर, उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि आम्ही एकत्र आहोत, असेही ते म्हणाले आहेत.

तर, नितीश कुमार यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. यावेळी शरद पवार म्हणाले की, यूपीएमध्ये सहमती आहे. इतर पक्ष एकत्र आणण्याचे काम करू. सगळ्यांची सहमती झाली तर एकत्र बसून चर्चा करणार आहोत. एक गठबंधन बनवणार व त्याचे नामकरण होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाने भरत गोगावलेंची मुख्य प्रतोदपदी केलेली नियुक्ती बेकायदेशीर ठरवली आहे. यामुळे एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे. व्हीप न मानणे म्हणजे राजकीय पक्षाशी असलेली नाळ तोडणे होय. फुटीच्या प्रकरणात कोणत्याही गटाला दावा करता येणार नाही की तेच मूळ राजकीय पक्ष आहेत, असे महत्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे.

Abhijeet Patil: अभिजित पाटील यांनी कारखाना वाचवण्यासाठी भाजपला दिला पाठिंबा

"हेमंत गोडसे आणि भारती पवार प्रचंड मताधिक्क्याने निवडून येतील", नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

Sharad Pawar: मतदानाच्या टक्केवारीबाबत शरद पवारांकडून चिंता व्यक्त

...म्हणून १९९९ ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Nilesh Rane On Vinayak Raut: माजी खासदार निलेश राणेंची विनायक राऊतांवर टीका