Shinde Group
Shinde Group Team Lokshahi
राजकारण

आम्ही 130 ते 140 जागा लढवणार..., बावनकुळेंच्या वक्तव्यावर शिवसेनेचं प्रत्युत्तर

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर वक्तव्य केले. भाजप 288 पैकी 240 जागा लढवणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. शिंदे गटाच्या नेत्यांची एकापाठोपाठ एक प्रतिक्रिया येत आहे. याच विषयावर आता शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी यावर भाष्य केले आहे.

काय म्हणाले संजय गायकवाड?

बावनकुळे यांच्या वक्तव्यावर बोलताना गायकवाड म्हणाले की, ‘बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना आणि भाजपची ही युती आहे. त्यामुळे कोणता नेता कुठलं वक्तव्य करत असेल तर त्याला काही महत्त्व नाही. आमची युती देशाचे पंतप्रधना नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचा हा युतीचा विषय आहे. त्यामुळे शिवसेना म्हणून आम्ही 130 ते 140 जागा लढवणार आहेत. आमच्या पेक्षा भाजप मोठा पक्ष असल्याने तो जास्त जागा लढवेल मात्र आम्ही 130 त्यापेक्षा कमी जागा लढणार नाही. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

पुढे ते म्हणाले की, शिवसेना म्हणून आम्ही कमीत कमी १३० ते १४० जागा लढवणार आहोत. आमच्यापेक्षा तो पक्ष (भाजपा) मोठा असल्याने निश्चितपणे भाजपा जास्त जागा लढेल. पण आम्ही शिवसेना म्हणून १२५ पेक्षा कमी जागा लढणार नाही. तसेच बावनकुळे यांच्याबद्दल विचारले असता गायकवाड म्हणाले की, अशा प्रकारची वक्तव्ये केल्याप्रकरणी पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी. असा सल्ला त्यांनी भाजपाला दिला.

चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी मुंबईमध्ये जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत मोठे वक्तव्य केलं होतं. यामध्ये त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युल्याबाबत जागावाटप सांगितलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी भाजप 240 जागा लढवणार तर 48 जागा शिवसेनेला देणार असल्याचे सांगितलं होते.

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं

'अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील' अजितदादांच धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांची खरमरीत टीका