kedar dighe | shivsena
kedar dighe | shivsena  team lokshahi
राजकारण

ठाण्यात पुन्हा दिघे राज, शिवसेनेकडून केदार दिघे मैदानात

Published by : Team Lokshahi

kedar dighe : शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक जण हे शिंदे गटात सहभागी होताना दिसत आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे, केदार दिघे, अनिता बिर्जे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मातोश्रीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी शिवसेनेसोबत कायम असल्याची ग्वाही दिली. या भेटीनंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने नवीन नियुक्त्या जाहीर केल्या. ठाणे जिल्हा प्रमुखपदी केदार दिघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे हा एकनाथ शिंदे यांना धक्का मानला जात आहे. (shivsena appoints kedar dighe thane district chief)

तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत काय घडलं याचा मी साक्षीदार आहे. जास्त बोलाल तर मी माझं तोंड उघडेल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता. शिंदे यांच्या इशाऱ्यानंतर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी आक्रमक भूमिका घेत धर्मवीरांसोबत काय घडलं याचे साक्षीदार होता तर 25 वर्ष का गप्प बसला?, असा सवाल एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. त्यामुळे आता केदार दिघे यांची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आज खासदार संजय राऊत यांना अखेर ईडीने अटक केली आहे. सकाळपासून त्यांची चौकशी सुरु होती. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊत यांना आता ईडी कार्यालयात घेऊन जाण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने धाड टाकली होती. सकाळपासून त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरु आहे. संजय राऊत यांच्या वेगवेगळ्या मालमत्तांवर छापे टाकण्यात आले असून, भांडुपनंतर कांजूरमार्ग आणि दादर येथील घरावरही ईडीने धाडी टाकल्या आहेत.

चंद्रशेखर बावनकुळेंना संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "काळू-बाळूच्या तमाशाने तुमच्या कानाखाली..."

आपल्या छातीवर धनुष्यबाण होता, पण आता मशाल आहे? निवडणुकीत काय परिणाम होणार? उद्धव ठाकरेंनी रोखठोक सांगितलं, म्हणाले...

Allu Arjun: मोठी बातमी! अभिनेता अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Sanjay Raut : 'नियमाप्रमाणे मोदींनी राजकारणातून निवृत्त व्हावं', राऊतांचा खोचक टोला

Chandrashekhar Bawankule: मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर बावनकुळेंचा जोरदार हल्लाबोल