Uddhav Thackeray
Uddhav Thackeray  Team Lokshahi
राजकारण

उध्दव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, लोकशाहीला अत्यंत घातक निकाल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांचा विजय झाला आहे. धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. यावर उध्दव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आजचा निकाल लोकशाहीला अत्यंत घातक असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

उध्दव ठाकरे म्हणाले की, आजचा निकाल लोकशाहीला अत्यंत घातक आहे. आपल्या देशाचा अमृत महोत्सवी साजारा करताना पंतप्रधांनांनी लाल किल्ल्यावर घोषणा करावी की 75 वर्षाचे स्वातंत्र्य संपलेले आहे. आणि आता लोकशाही संपवून बेबंदशाही सुरु होत आहे. आजपर्यंत अनेक उदाहरणे पाहिली आहेत की सरकारची दादागिरी चालली आहे. न्याययंत्रणा सुध्दा आपल्या दबावाखाली कशी येईल. यांच्याबद्दल गेले काही दिवस केंद्रीय कायदामंत्री बोलत आहेत. आणि राज्यसभेचे अधक्ष बोलत आहेत. त्यांना न्यायमुर्ती नेमण्याचेही अधिकार हवे आहेत. हे असेच सुरु राहीले तर देशातील लोकशाही संपलेली आहे. लोकशाहीला भावपूर्ण आदरांजली वाहून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात करत आहोत. हे धाडस तरी सर्व यंत्रणा घेऊन एकट्या लढणाऱ्या पंतप्रधानांनी दाखवावे, असे आव्हान त्याेनी दिले आहे.

निकाल अत्यंत अनपेक्षित आहे. कारण जवळपास सहा महिने सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. 21 तारखेपासून सलग सुनावणी सुरु होईल. तो निकाल जोपर्यंत लागत नाही. तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निकाल देऊ नये, अशी विनंती केली होती. पक्ष कोणाबरोबर आहे हे जर का केवळ लोकप्रतिनिधींच्या आकडेवारीनुसार ठरवायला लागलो. तर मग कोणीही धनाढ्य माणूस निवडून आलेले आमदार, खासदार विकत घेऊन पक्षाचा सर्वेसर्वा होऊ शकतो. देशाचा पंतप्रधान किंवा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. जशी न्यायाधीश नेमण्याची प्रतिक्रिया असते तशीच निवडणूक आयुक्त नेमण्यासुध्दा विरोधी पक्षांना सोबत घेण्याची गरज लागली आहे, असे मला आता वाटायला लागले आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

शिवानी वडेट्टीवार यांना कारणे दाखवा नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पत्रकार परिषद; ठाणे, नाशिक, पालघरचा तिढा सुटणार?

Labour Day Wishes: ज्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि समर्पणामुळे देश घडला अशा सर्व कामगारांना, कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Marathi Rajbhasha Day: मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन जागवा मराठीचा अभिमान!

Maharashtra Day 2024 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !