राजकारण

शरद पवारांना मी सल्ला देणार नाही; का म्हणाले उध्दव ठाकरे असे?

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यावरुन राजकारणात भूकंप आला असून पहिल्यादांच उध्दव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार सगळ्यांच्या हिताचा निर्णय घेतील, असे त्यांनी म्हंटले आहे. तर, मविआला तडा जाणार नाही, अशी कोणतीही गोष्टी राष्ट्रवादीत घडणार नाही, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला अधिकार असतो. तो निर्णय होऊ द्या. मग मी बोलेल. पण, महाविकास आघाडीला तडा जाईल, अशी कोणतीही गोष्टी राष्ट्रवादीत घडणार नाही. कार्यकर्त्यांचा नेत्यावर अधिकार असतो. शरद पवार सगळ्यांच्या हिताचा निर्णय घेतील. अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याचा सल्ला मी पवारांना देणार नाही. दिलेला सल्ला त्यांना पचनी पडला नाही तर मी काय करणार, असेही उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.

तर, लोक माझे सांगाती या पुस्तकातून शरद पवारांनी उध्दव ठाकरे दोन वेळाच मंत्रालयात आल्याचे म्हंटले होते. यावर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री म्हणून काय केले हे जगजाहीर आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबाचा सदस्य वाटतो हे माझ्यासाठी खूप आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, वज्रमुठ सभांचा कार्यक्रम मे अखेर किंवा जूनपर्यंत करायचा ठरवले होते. पण, खारघर घटनेनंतर थोडा विचार बदलला. कारण सभा संध्याकाळी असल्या तरी लोक दुपारपासून येऊन बसतात. यामुळे या सभांचे नियोजन मेनंतर केले जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

"...तर सर्वसाधारण कार्यकर्तासुद्धा खासदार बनू शकतो"; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेश म्हस्केंचं मोठं विधान

IPL 2024 : आरसीबी आणि मुंबई इंडियन्सला अजूनही प्ले ऑफमध्ये खेळण्याची संधी, 'असं' आहे समीकरण

"नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न केला, तर..."; संजय राऊतांनी दिला इशारा

नाशिकमध्ये शिवसेनेकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर; छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

अखेर नाशिकचा तिढा सुटला; शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर