Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis
Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis Team Lokshahi
राजकारण

औरंगाबाद अन् उस्मानाबादच्या नामांतर मंजुरीनंतर उध्दव ठाकरेंनी मानले सरकारचे आभार; म्हणाले, याबद्दल...

Published by : Sagar Pradhan

अनेक दिवसांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित होता. त्यानंतर आज केंद्र सरकारने या दोन्ही शहरांच्या नामांतराला मंजुरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. यावरच आता अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यावरच आता ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतरचा प्रस्ताव आम्ही मंजूर केले

केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतरचा प्रस्ताव आम्ही मंजूर केले, त्यानंतर आज या मंजुरी मिळालेली आहे. परंतु सध्याच्या राज्य सरकारला एवढ्या पुरते धन्यवाद देतो की, इतर अनेक निर्णयांनी त्यांनी स्थगिती दिली होती, मात्र आम्ही जो नामांतराच्या प्रस्तावाचा निर्णय घेतला होता, त्याला स्थगिती दिली नाही. याबद्दल धन्यवाद देतो.

पुढे ते म्हणाले की, तो क्षण आठवतोय, माझी शेवटची कॅबिनेट बैठक होती. ज्यावेळी शेवटी हे दोन्ही प्रस्ताव आले, ते प्रस्ताव मांडल्याबरोबर मित्रपक्षांचे मंत्रिमंडळातील जे सदस्य होते, त्यांनी होकार दिला. कोणीही शंका कुशंका काढली नाही. जे नामांतर यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी करू म्हंटल होते, पण त्यांना करता आले नाही. मात्र ते आम्ही करू शकलो, याचा मला अभिमान आहे, असे उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले.

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Yamini Jadhav : प्रचाराला कमी दिवस असले तरी आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या दृष्टीकोनातून लोकांपर्यंत पोहचलेलो आहोत

सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सूचना

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Lottery: मनमाडमधील ग्राहकाने जिंकली ७ लाख रुपयांची लॉटरी