Ramesh Bais
Ramesh Bais Team Lokshahi
ताज्या बातम्या

राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांची अशी आहे कारकिर्द; जाणुन घ्या सविस्तर

Published by : Sagar Pradhan

केंद्र सरकारने देशभरातील 13 राज्यातील राज्यपाल आणि उपराज्यपाल यांच्यात बदल केले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महापुरुषांबद्दल अनेक आक्षेपार्ह आणि वादग्रस्त व्यक्तव्यामुळे चर्चेत राहिले होते. मात्र, आज अखेर राज्याच्या राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी रमेश बैस हे राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. याच नवीन राज्यपालांबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

रमेश बैस हे राज्याचे 14वे राज्यपाल म्हणून नियुक्त होणार आहेत. याआधी ते झारखंडचे राज्यपाल होते. रमेश बैस हे तब्बल सात वेळा खासदार राहिले आहेत. बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 मध्ये छत्तीसगढच्या रायपूरमध्ये झाला. 1978 मध्ये सर्वात आधी नगरपालिकेत निवडून गेले होते. यानंतर 1980 ते 1984 मध्ये आमदार म्हणून मध्यप्रदेश विधानसभेत ते निवडून गेले होते. त्यानंतर रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा ते खासदार होते. सोबतच त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात त्यांनी केंद्रातही राज्यमंत्रीपद भूषवले आहे. त्यानंतर रमेश बैस यापूर्वी झारखंड आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते. यासोबतच ते मध्य प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष देखील होते.

झारखंड सरकार आणि रमेश बैस यांचाही संघर्ष दिसून आला...

रमेश बैस यांनी झारखंड विधानसभेने संमत केलेले 'झारखंड वित्त विधेयक-2022 ' दोन दिवसांपुर्वीच राज्य सरकारकडे परत पाठवले. तिसऱ्यांदाही त्यांनी हे विधेयक परत पाठवले. यामुळे झारखंड सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष दिसून आला.

दिनविशेष 10 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Mother's Day Special 2024: आई-मुलांच्या नात्यावर भाष्य करणारे 'हे' सिनेमे नक्की पाहा

Akshay Tritiya 2024 Wishes in Marathi: अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा

"लोकांनी निवडून दिलं पण अमोल कोल्हेंनी पाच वर्षात कामं केली नाहीत"; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हल्लाबोल

Chicken Shawarma: घरच्याघरी तयार करा चटकदार आणि पौष्टिक चिकन शॉरमा; जाणून घ्या रेसिपी...