Heavy rain | Flood team lokshahi
ताज्या बातम्या

पावसामुळे आतापर्यंत 102 जणांचा मृत्यू, 20 गावांचा तुटला संपर्क

अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 183 जनावरांचा मृत्यू

Published by : Shubham Tate

Heavy rain : 01 जूनपासून महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे 102 जणांना जीव गमवावा लागला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 20 गावांचा संपर्क तुटला आहे. पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 11 हजार 836 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. (people died due to rain in Maharashtra villages lost contact)

नाशिक जिल्ह्यातील चौक मंडई परिसरात शनिवारी पहाटे पावसामुळे जुन्या घराची भिंत कोसळून दोन जण जखमी झाले. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये NDRF च्या 14 टीम आणि SDRF च्या 5 टीम मदत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत.

राज्य नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. गडचिरोली, भंडारा, पालघर, चंद्रपूर, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे येथेही मुसळधार पाऊस पडत आहे. यावर्षी पावसाने आतापर्यंत 102 जणांचा बळी घेतला आहे. राज्यात पावसाचा फटका मानवासह जनावरांना बसला आहे.

अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 183 जनावरांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 11 हजार 836 लोकांना पुरातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. या सर्वांना मदत केंद्रात ठेवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर शुक्रवारी रात्रीपासून थोडा कमी झाला आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी कमी होत आहे. हवामान खात्याने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पिवळा आणि हिरवा अलर्ट जारी केला आहे. यासोबतच पुढील काही दिवस राज्यात कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?