POCSO ACT|Crime News team lokshahi
ताज्या बातम्या

Pocso ACT : शिक्षकाने विद्यार्थिनीचे खाजगी फोटो केले व्हायरल, धक्कादायक कारण आलं समोर

POCSO कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

Published by : Shubham Tate

विद्यार्थिनीचे खाजगी फोटो लीक केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकानेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनीचे लग्न मोडण्याच्या उद्देशाने हे सर्व केले असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. (teacher leaked the private photos of the girl student filed a case under the pocso act)

पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ४४ वर्षीय शिक्षकाने विद्यार्थिनीशी लग्न करण्याचे आश्वासन देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यादरम्यान त्यांनी खासगी क्षणांचे फोटोही काढले.

लग्न मोडण्यासाठी खाजगी फोटो व्हायरल

दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्याच व्यक्तीसोबत लावून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आरोपी शिक्षकाने मुलीचे लग्न रोखण्यासाठी खासगी फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर पोस्ट केले. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी आरोपी शिक्षकाला बेदम मारहाण केली. त्यांनी त्याला खेचत पोलिस ठाण्यात नेले आणि तक्रार दाखल केली.

तसेच प्राध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

दुसर्‍या एका प्रकरणात, सावनूर पोलिसांनी सहाय्यक प्राध्यापकाविरुद्ध कलम ३७६(२)(एन) आणि ५०६ (गुन्हेगारी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कलमांनुसार आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. बी.कॉम.चे शिक्षण घेत असलेल्या मुलीला धमकावून तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप प्राध्यापकावर आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा