क्रीडा

IND vs SL T-20 Series : भारत विरुद्ध श्रीलंका T-20 सामन्यांच्या मालिकेतील तीसरा व अखेरचा सामना आज खेळवला जाईल

Published by : Vikrant Shinde

भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T-20 मालिकेपैकी तिसरा टी20 (3rd T20) सामना आज खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने आधीच जिंकल्यामुळे मालिकेत (India won Series) विजय मिळवला आहे. पण आज भारताला श्रीलंकेला क्लीन स्वीप करण्याची उत्तम संधी आहे. तर दुसरीकडे श्रीलंका शेवटचा सामना किमान जिंकून शेवट गोड करण्यासाठी मैदानात उतरेल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिले दोन्ही सामना भारताने जिंकले. यात पहिला सामना भारताने 62 धावांनी तर दुसरा सामना 7 विकेट्सनी जिंकला. दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकल्यामुळे तिसऱ्या सामन्यातही भारताचं पारडं जड राहील असा अंदाज वर्तवला जातोय. परंतू, IPL च्या Mega Auction मधील सर्वात महागडा आणि भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू ईशान किशन (Ishan Kishan) मात्र दुसऱ्या सामन्यातील दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकणार आहे.

तिसऱ्या T-20 सामन्यासाठीचा भारतीय संघ:
ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, रवींद्र जाडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल

(Ruturaj Gaikwad, Sanju Samson (Wicketkeeper), Rohit Sharma (Captain), Shreyas Iyer, Venkatesh Iyer, Deepak Hooda, Ravindra Jadeja, Hershal Patel, Bhuvneshwar Kumar, Jaspreet Bumrah, Yuzvendra Chahal)

तिसऱ्या टी-20 तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी श्रीलंका संघ:
दसुन शनाका (कर्णधार), पथुम निसानका, कुसल मेन्डिस, चरित असलांका (उपकर्णधार), दिनेश चांदीमल, दनुष्का गुणथिलक, जनिथ लियानागे, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा, महेश दीक्षाना

(Dasun Shanaka (captain), Pathum Nissanka, Kusal Mendis, Charit Asalanka (vice-captain), Dinesh Chandimal, Danushka Gunathilak, Janith Lianage, Chamika Karunaratne, Dushmantha Chamira, Lahiru Kumara, Mahesh Dikshana)

IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा खेळ खल्लास! RCB चा संघही होणार टूर्नामेंटमधून बाहेर? गुणतालिका एकदा पाहाच

"...म्हणून संपूर्ण भारताचं लक्ष शिर्डीच्या खासदाराकडे आहे"; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

"साहेब आजारी पडतात, साहेबांनी घरी थांबावं", उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शरद पवारांना सल्ला

Rahul Gandhi: 'अंबानी टेम्पोने पैसे देतात याचा मोदींना अनुभव' राहुल गांधींचं मोदींना प्रत्युत्तर

Ajit Pawar: पीडीसीसी बँकेतील पैसे वाटपाच्या आरोपावर अजित पवारांची प्रतिक्रिया