क्रीडा

Ind Vs Pak CWG 2022 : भारताचा पाकिस्तानवर 8 गडी राखून दणदणीत विजय

Published by : Team Lokshahi

नवी दिल्ली : कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CWG 2022) मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने (Team India) आज पाकिस्तानावर (Pakistan) दणदणीत विजय मिळवला. स्मृती मंधानाच्या (Smriti Mandhana) जोरदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पाकिस्तानचा तब्बल 8 गडी राखून पराभव केला. स्मृतीनं विजयी षटकार लगावत मॅच संपवली. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचा हा पहिला विजय आहे.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पावसामुळे सामना 18 षटकांचा करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानी संघ भारतीय गोलंदाजांसमोर पत्त्यासारखा कोसळला. पाकिस्तानने 18 षटकात केवळ 99 धावा केल्या आणि संपूर्ण संघ बाद झाला. भारताकडून स्नेह राणा, राधा यादव यांनी 2-2 तर रेणुका-मेघना आणि शेफाली यांनी 1-1 विकेट घेतली.

भारतीय फलंदाज स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. शेफाली वर्मा 9 चेंडूत 16 धावा करून बाद झाली. शेफाली आणि स्मृती यांच्यात अवघ्या 35 चेंडूत 64 धावांची भागीदारी झाली. तर, यावंतर स्मृती मानधनाने फॉर्ममध्ये येत अवघ्या 42 चेंडूत 63 धावांची जलद खेळी केली. या खेळीत तिने 8 चौकार आणि 3 षटकार मारले. भारताने 12व्या षटकातच दोन गडी गमावून पाकिस्तानवर विजय मिळवला.

Shrikant Shinde: "राज ठाकरेंचे विचार हे शिवसेनेचे विचार"

काँग्रेसमध्ये नाराज असलेले काँग्रेस नेते आबा बागुल आजपासून रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात सक्रिय

Sanjay Raut : फडणवीस लवंगी फटाक्याइतकाही स्फोट करु शकत नाहीत

Sanjay Raut : निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा ?

किरण सामंत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?