मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या दिव्यज फाऊंडेशनच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) परस्परांपासून अंतर राखून बसल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळाले होते.
कल्याण-डोंबिवली तसेच राज्यभरात सुरू असलेल्या “फोडाफोडी”च्या घडामोडींवरून निर्माण झालेल्या नाराजीनाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर पहिल्यांदाच भाजपवर नाव न घेता थेट प्रहार केला आहे.
विधानसभा निवडणुकीतल्या यशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीला अनुकूल वातावरण तयार झालं आहे. मात्र, काही नेत्यांकडून त्या वातावरणात गोंधळ आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
येत्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांपूर्वी राज्यात पक्षांतराला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला.
“जेव्हा जेव्हा पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीची तारीख जवळ येते. तेव्हा यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात. त्यांचे मालक दिल्लीत असल्याने यांना जावं लागतं. कधी अमित शाहांना भेटतात, कधी मोदींना भेटतात. ...