मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांचे नाव आल्यानंतर अजित पवार यांनी जमिनीचे व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केले.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अधिनियम (मनरेगा) वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष देशव्यापी आंदोलन छेडणार आहे. दिल्लीत पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.