आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच एका कार्यक्रमात ठाकरे गटावर टीका केली आहे.
आज शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा दादर येथील शिवतीर्थ येथे पार पडत आहे. यादरम्यान प्रथम भाषणासाठी ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सर्वप्रथम मंचावर येऊन भाजपवर जोरदार टीका केली.