अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २: द रूल’ हा चित्रपट सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा भारतीय चित्रपट ठरला आहे. जगभरातील कलेक्शन मिळून या चित्रपटाने १५०० कोटींचा टप्पा गाठला आहे.
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' नं बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. 5 डिसेंबरला रिलिज झालेल्या या चित्रपटानं देशभरात 164.25 कोटींची कमाई करत सर्वात मोठी ओपनिंग करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.
अवघ्या ६ मिनीटांच्या सीनसाठी ६० कोटी खर्च केल्याचं सांगण्यात येत आहे. हा सीन म्हणजे ‘गंगम्मा जतारा’ सीन आहे. ज्यामध्ये अल्लू अर्जुन पूर्णपणे वेगळ्या रुपात दिसत आहे.