Chhatrapati Sambhaji Nagar Accident
Chhatrapati Sambhaji Nagar Accident  
ताज्या बातम्या

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात

Published by : Pankaj Prabhakar Rane

छत्रपती संभाजीनगर : सचिन बडे | सासरवाडीला जाणाऱ्या कुटुंबाला रस्त्यात मृत्यूनं गाठलं आणि एक क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सासरवाडीला जाण्यासाठी निघालेल्या कुटुंबावर काळानं घात केला आणि शिक्षक वडील आणि मुलाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. तर आई गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये मोटार सायकल तर चक्क दोन गाड्यांच्या मध्ये चेपल्यासारखीच झाली. या विचित्र अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर रोडवरील नक्षलवाडी गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन हायवा, एक मोटारसायकल आणि कारचा अशा चार वाहनाचा आगळावेगळा भीषण अपघात झाला.या अपघातात पैठण येथील शिक्षक संजय सुखदेव दहिफळे आणि 13 वर्षीय मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला आहे.कौशल्या दहिफळे या गंभीर जखमी झाल्या आहे. दहिफळे हे दांपत्य सासरवाडीला जात असताना हा काळाने घाला घातल्याने साखर कारखाना आणि पैठण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; अंधारेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम आज उमेदवारी अर्ज दाखल करणार; म्हणाले...

Avinash Jadhav : मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Rahul Gandhi : रायबरेलीतून राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर