Astik Kumar Pandey
Astik Kumar Pandey Team Lokshahi
ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना 'ईडी'ची नोटीस; 'या' प्रकरणामुळे पाण्डेय यांना नोटीस

Published by : Sagar Pradhan

ईडी म्हणजेच सक्तवसुली संचलनालयाकडून राजकीय नेत्यांवर होणाऱ्या कारवाईमुळे ईडीची कायम चर्चा होत असताना आता ईडीची नजर आता प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गेली आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा प्रकरणात छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तसेच तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. ईडीने नोटीसीद्वारे जिल्हाधिकारी पाण्डेय यांना आजच मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. यासोबतच या योजनेत यापूर्वी महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांची देखील चौकशी करण्यात आली होती.

नेमकं काय प्रकरण?

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका विभागात ४० हजार घरे बांधण्यासाठी 4 हजार कोटी रुपयांच्या बांधकाम निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र या टेंडर प्रक्रियेत कंपनीकडून घोटाळा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर हे प्रकरण ईडीकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर ज्या कंपनीला कंत्राट मिळाले त्या संबंधित लोकांच्या निवासस्थानांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले होते. याच प्रकरणात आता संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना ईडीने नोटीस बजावली आहे.

...म्हणून १९९९ ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Nilesh Rane On Vinayak Raut: माजी खासदार निलेश राणेंची विनायक राऊतांवर टीका

महायुतीसह मविआमध्ये उमेदवारी अर्जासाठी लगबग

Shrikant Shinde: "राज ठाकरेंचे विचार हे शिवसेनेचे विचार"

काँग्रेसमध्ये नाराज असलेले काँग्रेस नेते आबा बागुल आजपासून रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात सक्रिय